बहुजननामा ऑनलाईन टीम : बिग बॉस 14 (Bigg Boss Season 14) मध्ये 6 नवीन चॅलेंजर्सची एन्ट्री झाली आहे. रविवारी शोचा होस्ट सलमान खान (Salman Khan) यानं या 6 चॅलेंजर्सला इंट्रोड्युस केलं आहे. यात राखी सावंत, विकास गुप्ता, राहुल महाजन, कश्मीरा शाह, अर्शी खान आणि मनु पंजाबी यांचा समावेश आहे. घरात आल्यापासून ड्रामा क्वीन राखी सावंत (Rakhi Sawant) काही ना काही कराणानं चर्चेत येत आहे.
खास बात अशी की राखीच्या लग्नाबद्दल अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. तिचं लग्न खरंच झालं आहे का, आणि झालं असेल तर तिचा पती कुठं आहे. घरातही तिला याबाबत सवाल करण्यात आले आहेत. या सगळ्या दरम्यान आता राखीनं ठरवलं आहे की, ती लवकरच आता तिच्या पतीला सर्वांसमोर आणणार आहे. सोबतच तिनं हेही सांगितलं आहे की, तिचा पती काय करतो.
https://www.instagram.com/p/CIkPwSnJv01/
एका इंग्रजी वृत्तपत्रासोबत बोलताना राखी सावंत म्हणाली, मला माहित आहे की, आता हा हाय टाईम आहे लोकं, खास करून माझे चाहते त्याला (पती) पाहू इच्छित आहेत. जेव्हापासून माझं लग्न झालं आहे तेव्हापासून मला हा प्रश्न केला जात आहे. आता मी बिग बॉसच्या घरात जाणार आहे तर मी स्वत: त्याला समोर आणू इच्छित आहे. मी तर त्याला थेट धमकीच दिली आहे की, आता त्याला सर्वांच्या समोर यावंच लागेल. जर सलमान सरांनी त्याला भेटण्यासाठी विचारलं तर मी काय सांगणार ?
https://www.instagram.com/p/CIkPsMeJjuO/
राखीनं सांगितलं की, आमचं लग्न खूप कठिण परिस्थितीत झालं आहे. त्यामुळं आम्ही याबद्दल कोणालाही नाही सांगितलं. हे लव आणि अरेंज मॅरेज होतं. माझा पती एक युके बेस्ड बिजनेसमन आहे. मी लवकरच त्याच्याबद्दल पब्लिकला सांगेन, तेव्हा दूध का दूध आणि पानी का पानी होईल.
https://www.instagram.com/p/CIjDk3ppnIT/
https://www.instagram.com/p/CIbGRAjJoYJ/
https://www.instagram.com/p/CEyjdVRDHsF/