नवी दिल्ली : वृत्तसंस्था – इस्लामिक देश तुर्कीने आण्विक शस्त्रे बनवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. तुर्कीचे अध्यक्ष रेजेप तैय्यप एर्दोगन यांनी नुकत्याच झालेल्या पक्षाच्या बैठकीत तुर्कीमध्ये अण्वस्त्रे तयार करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. एर्दोगान यांनी, काही देशांकडे अण्वस्त्रांनी सज्ज असलेली क्षेपणास्त्रं आहेत, पण ती आपल्याकडे नाहीत. अशी खंत व्यक्त केली आहे. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी पाकिस्तानचे अणु तस्कर अब्दुल कादिर खान यांनी सांगितले की, त्याने अण्वस्त्र तंत्रज्ञान काही देशांना विकले आणि बेकायदेशीरपणे त्याची निर्यातही केली. आता तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांच्या विधानानंतर हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. कारण अध्यक्ष एर्दोगन यांनी तुर्कीला अण्वस्त्र बनवण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती आहे. या सर्व चर्चांच्या मध्यस्थानी पाकिस्तानचा संदर्भ येत आहे. कारण पाकिस्तान हे अणूप्रसारासाठी ओळखले जाते .
तुर्कीचे अध्यक्ष रेजेप तैय्यप एर्दोगान यांच्या या वक्तव्यानंतर अमेरिकेतील हालचाली वाढल्या आहेत. अमेरिकेच्या एका वृत्तपत्राने सोमवारी आपल्या अहवालात लिहिले की, अमेरिका या तुर्कीच्या या नेत्याला (एर्दोगन) आपला मित्र देश उध्वस्त करण्यापासून रोखू शकत नसेल. तर तो त्यांना अण्वस्त्रे तयार करण्यास किंवा इराण सारखे अणु तंत्रज्ञान गोळा करण्यास तो त्यांना कसे रोखू शकेल ? पुढे या अहवालात लिहिले आहे की, तुर्की आधीच बॉम्ब बनविण्याच्या कार्यक्रमात काम करत आहे. त्याने युरेनियमचा साठा गोळा केला आहे आणि अणुभट्ट्यांशी संबंधित संशोधन करीत आहेत. जगातील कुख्यात अणु तस्कर अब्दुल कादिर खान या पाकिस्तानी नागरिकाबरोबर तुर्कस्तानचा गुप्त करार असल्याचेही अहवालात म्हटले आहे.
विशेष म्हणजे लंडनच्या थिंक-टँक इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्ट्रॅटेजिक स्टडीजने पाकिस्तानच्या कुप्रसिद्ध अणु तस्कर अब्दुल कादिर खान यांच्या नेटवर्कवर न्यूक्लियर ब्लॅक मार्केट या नावाने अभ्यास केला होता. अभ्यासानुसार तुर्कीच्या कंपन्यांनी अब्दुलला युरोपमधून अणु सामग्री आयात करण्यात मदत केली होती. वास्तविक, २००४ मध्ये पाकिस्तानने प्रथमच अणु तंत्रज्ञान विकल्याचा खुलासा २००४-०५ मध्ये झाला. त्याचवेळी अणु तस्कर अब्दुल कादिर खान यांनी टीव्हीमध्ये कबूल केले होते की त्याने त्याचे तंत्रज्ञान अनेक देशांना विकले आहे. कादिरने असे म्हटले असले तरी त्यांनी ते खाजगी केले, पण त्यात पाकिस्तानची कोणतीही भूमिका नाही. परंतु या प्रक्रियेत पाकिस्तानची यंत्रणा आणि सुविधा वापरल्या गेल्या हे स्पष्ट झाले.
पाकिस्तानची प्रतिमा सुधारण्यासाठी पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती जनरल परवेझ मुशर्रफ यांनी कादिरला कारवाई दाखवताना त्यांना ताब्यात घेतले. अण्वस्त्र प्रसारासाठी दोषी ठरत असलेल्या आणि जगभरातील बेजबाबदार देश म्हणून बदनाम होत असलेल्या पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय समुदायाने यावर कोणतीही बंदी आणू नये म्हणून ही कारवाई केली. अलीकडे अब्दुल कादिर सार्वजनिक ठिकाणी दिसला. कराची विद्यापीठातील एका कार्यक्रमात ते म्हणाले की, पाकिस्तानने तुर्की आणि मलेशियाशी संबंध वाढवावेत. अलिकडच्या काळात पंतप्रधान इम्रान खान यांनी मलेशिया आणि तुर्कीबरोबर पाकिस्तानचे संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आहे. हे प्रयत्न अशा वेळी केले जात आहेत जेव्हा पाकिस्तान दहशतवाद्याचे प्रायोजकत्व आणि पाठिंबा दर्शविल्यामुळे जगाच्या प्रत्येक मदतीपासून अलिप्त आहे. चीनदेखील या युतीचा एक भाग असल्याचे दिसते.
Visit : bahujannama.com