नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आधार कार्ड हे प्रत्येक भारतीय नागरिकासाठी सर्वात महत्वाचे दस्तऐवज बनले आहे. बँक खाते उघडण्यापासून आयकर भरण्यापर्यंत आधार कार्ड आवश्यक आहे. यूनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) आधार कार्ड असलेल्या प्रत्येकाला डिजिटल कॉपी ठेवण्याची परवानगी देतो. आधार कार्डची डिजिटल कॉपी हार्ड कॉपीइतकीच वैध आहे.
UIDAI वेबसाइटवरून आधार कार्डची इलेक्ट्रॉनिक कॉपी डाउनलोड केल्यानंतर आपण आपली फाईल पासवर्ड टाकून उघडता. आपल्या डिजिटल आधार कार्डवर स्वाक्षरी आहे की नाही हे जाणून घेऊ इच्छित असल्यास, आपल्याला आधार कार्डमध्ये प्रविष्ट केलेल्या तपशीलात व्हॅलीडीटी स्पेस पहावे लागेल. जर त्यावर “?” साइन इन असेल तर याचा अर्थ असा की आपले डिजिटल आधार कार्ड म्यान्युअल पद्धतीने व्हॅलीडेट करावे लागेल.
ई-आधारला डिजिटल स्वाक्षरी कशी जोडली जाऊ शकते हे जाणून घ्या:
1. पासवर्ड द्वारे आधार कार्डची पीडीएफ कॉपी उघडा.
2. पीडीएफ फाईल उघडल्यानंतर Validity Unknown चिन्हाकडे पहा.
3. या चिन्हावर राइट क्लिक करा आणि “Validate Signeture” वर क्लिक करा.
4. त्यानंतर एक नवीन विंडो उघडेल. येथे “Signeture Propertis” वर क्लिक करा.
5. आता ‘Show Cetificate’ वर क्लिक करा.
6. इथं एक चौकशी करा की कुठंही “NIC sub-CA for NIC 2011, National Informatics Centre ” आहे की नाही हे तपासायचे आहे. यावर मार्क करून Trust या टॅबवर क्लिक करा आणि नंतर “Add To Trusted Identities” हा पर्याय निवडा.
7. यानंतर, सुरक्षा प्रश्न विंडोवर “Ok” रिप्लाय करा.
8. आता ‘युज द सर्टिफिकेट एज ए ट्रस्टेड रूट’ वर खूण करा आणि दोनदा ‘Ok’ वर क्लिक करा.
9. नंतर पडताळणी पूर्ण करण्यासाठी “Validate Signeture” वर क्लिक करा.