केरळ : वृत्तसंस्था – केरळमध्ये एक चोरीची घटना समोर आली असून एक चोर चोरी करण्यासाठी एका घरात घुसल्यावर त्याला कळले की, ते एका कर्नलचे घर आहे, तेव्हा त्याच्या मनात देशभक्तीची भावना जागी झाली. ही घटना केरळच्या तिरुवनकुलम येथील असून चोर ज्या घरात चोरी करण्यासाठी गेला ते घर एका आर्मी रिटायर्ड कर्नलचे होते. हे समजल्यावर त्याने पहिले तर १५ हजार रुपये चोरले आणि नंतर कर्नलच्या वॉर्डरॉबमधून एक दारूची बाटली घेतली आणि भिंतीवर माफीनामा लिहिला जो व्हायरल झाला.
या माफीनाम्याच्या सुरुवातीला त्याने बायबलच्या काही ओळी लिहिल्या. त्यानंतर मला माहित नव्हते की, हे घर लष्कर अधिकाऱ्याचे आहे. नाहीतर मी येथे चोरी करायला आलो नसतो. सैनिकी टोपी पाहिल्यावर मला माहित झाले की, हे लष्कर अधिकाऱ्याचे घर आहे. कृपया मला माफ करा, असे लिहिले आहे. चोराने पुढे बायबलमधील सातव्या आदेशाचे उल्लंघन केले असून तुम्ही नरकापर्यंत माझा पाठलाग करणार. एवढे लिहून तो तेथून निघून गेला.
सोबतच त्याने त्याच्या टायरच्या दुकानाचे कागदपत्र असलेली बॅगही तेथेच सोडून गेला. कदाचित ते त्याने अगोदर चोरले होते. या बॅगेसोबत एक नोटही त्याने लिहिली. त्यात ही बॅग दुकानाच्या मालकाला पाठवायला सांगितले होते. या घरात राहणारे रिटायर्ड कर्नल दोन महिन्यांसाठी फिरायला म्हणून बाहेर गेले होते. सकाळी जेव्हा नोकर घराची साफसफाई करत होता तेव्हा त्याला भिंतीवर लिहिलेला मजकूर दिसला आणि त्याने पोलिसांना खबर दिली. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून चोराने लक्ष भटकवण्यासाठी हे सगळं केले असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाची तपासणी केली जात आहे.