बहुजननामा ऑनलाइन टीम – थेऊर प्रवाशांना धारदार शस्त्राचा धाक दाखवून लुटमार करणार्या टोळीतील इसमास लोणीकंद गुन्हे प्रकटीकरण पथकाने चोवीस तासात गजाआड केले.
लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन चंद्रपाल ढगे वय 32वर्षे, रा. प्रशांत सोसायटी, मांजरी बुद्रुक, पुणे यांना दिनांक 29/01/2021 रोजी रात्री 9/45 वाजता चे सुमारास अज्ञात इसमांनी दुचाकी वरून पाठीमागून येऊन कारला दुचाकी आडवी लावून खाली उतरवले तसेच दगडाने व कोयत्याने मारहाण मारून कारचे काचा फोडून नुकसान केले तसेच मित्र गणेश ढवळे यास देखील डावे खांद्यावर, उजवे हातावर व मांडीवर कोयत्याने मारहाण करून जखमी केले त्याच्या खिशातील ए टी एम, एर्टिगा गाडीची चावी व रेडमी कंपनीचा मोबाईल असा एकूण 5700 रुपये किंमतीचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरून नेला आहे.
या गुन्ह्याचा गुन्हे शोध पथक कसून तपास करीत असताना दि 31/01/2021 रोजी गुन्ह्याचा तपास सुरू असताना वाघोली गावच्या हद्दीत गस्त घालत असताना गुन्हे शोध पथकातील पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे व ऋषिकेश व्यवहारे यांना या गुन्ह्यातील एक संशयित कुमार बिल्डर्स बांधकामावर येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. म्हणून पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांचे आदेशाने माहिती मिळालेल्या ठिकाणी रवाना होवून इसमास बाळासाहेब सकाटे व ऋषिकेश व्यवहारे यांनी सापळा रचून ताब्यात घेतले व चौकशीत त्याचे नाव पत्ता विचारले त्याने त्याचे नाव अभिजित उर्फ अभ्या महादेव कांबळे वय 26 वर्षे, रा. 72 घरकुल, मांजराई नगर, मांजरी बुद्रुक, पुणे असे सांगितले.व गुन्ह्याची कबुली दिली असून त्याचे कडून गुन्ह्यात वापरलेली बजाज कंपनीची डिस्कव्हर दुचाकी क्रमांक एम एच 12 एच एक्स 4583 ही जप्त करण्यात आलेली आहे. अभिजित कांबळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याचेवर यापूर्वी देखील लोणीकंद, हडपसर पोलीस ठाणे येथे चोरी व जबरी चोरीचे एकूण 02 गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विक्रम जाधव हे करीत आहेत.
ही कामगिरी, पोलिस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरिक्षक हणमंत पडळकर, पोलीस उपनिरिक्षक विक्रम जाधव, गुन्हे शोध पथकाचे बाळासाहेब सकाटे, दत्ता काळे, समीर पिलाने, ऋषिकेश व्यवहारे, संतोष मारकड, सूरज वळेकर, निलेश शिंदे, योगेश भंडारे यांनी केली.