बहुजननामा ऑनलाइन टीम – मौजमजेसाठी कळंबच्या समुद्र किनारी फिरण्याचा उत्साह वसईतील एका तरुण तरुणीच्या चांगलाच अंगलट आला आहे.(car carried to the sea) दोघेही फिरण्यासाठी मंगळवारी (दि. 29) आपली स्विफ्ट कार घेऊन समुद्र किनाऱ्यावर गेले होते. रात्रीच्या वेळी त्यांनी त्याच ठिकाणी थांबण्याचा बेत आखला. आपली कार किना-यावरच पार्क केली. मात्र रात्री भरतीच्या पाण्यासोबत कार समुद्राच्या पाण्यात वाहून गेली. दोघांनी सकाळी उठल्यानंतर आपली चारचाकी जागेवर नसल्याचे पहिले असता ती चारचाकी समुद्राच्या पाण्यात वाहत जाऊन भुईगाव किनाऱ्यावर जाऊन अडकल्याचे दिसून आले.
त्यानंतर याबाबत तातडीने वसई पोलिसांना, अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मागील 20 तासांहून अधिक वेळ ही चारचाकी समुद्रात 500 मीटर अंतरावर तरंगत असून तिला काढण्याचे प्रयत्न सध्या सुरु आहेत. मात्र, लाटामुळे समुद्रातील पाणी ढवळत असल्याने कार बाहेर काढणे जिकिरीचे होत आहे. सायंकाळपर्यंत ही कार बाहेर काढण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.