नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तेलंगणामध्ये प्राथमिक शाळेतील 40 वर्षीय शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. असा आरोप केला जात आहे की, शिक्षक 2, 3 आणि 4 वर्गामध्ये शिकणार्या विद्यार्थीनींचा लैंगिक छळ करीत होता. कोरोना महामारी लक्षात ठेवून तो त्यांना क्लासच्या बहाण्याने शाळेत एकटाच बोलवायचा, कारण या विद्यार्थीनींकडे ऑनलाइन क्लाससाठी स्मार्टफोन नव्हते.
कसा खुलासा झाला?
मिळालेल्या माहितीनुसार, जेव्हा विद्यार्थीनी आजारी पडली आणि तिला रुग्णालयात दाखल करावे लागले तेव्हा ही बाब उघडकीस आली. यादरम्यान तिने आपल्या आईला आपल्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराबद्दल सांगितले. घटनेची माहिती समजल्यानंतर मुलीच्या पालकांसह संतप्त ग्रामस्थांनी आरोपी शिक्षकाला मारहाण केली.
हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर शाळेतील अन्य विद्यार्थीनींची चौकशी केली जात असल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी असे आढळले की, 7 ते 11 वर्षे वयोगटातील 5 ते 6 विद्यार्थिनींवर शिक्षकाने लैंगिक अत्याचार केले. सध्या पीडितांची वैद्यकीय तपासणी केली जात आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील दत्त म्हणाले, “लॉकडाउन दरम्यान त्याने पाच ते सहा विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचार केले. आम्ही त्याला अटक केली आहे आणि या प्रकरणाचा तपास करत आहोत.”
वृत्तानुसार आरोपी शिक्षक विद्यार्थ्यांनीना अश्लील सामग्री दाखवत असे आणि त्याबद्दल तोंड न उघडण्याची धमकी देत असे. सध्या शिक्षकाविरूद्ध बलात्कार व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.