पुणे : – Swargate Pune Crime News | कोल्हापूर येथील एका 34 वर्षीय महिलेला लग्न करण्याचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) पुण्यातील एका व्यक्तीने तिच्यावर बलात्कार केला (Rape Case Pune) . त्यानंतर तिच्या जवळील सोन्याचे दागिने व ऑनलाइन अडीच लाख रुपये घेऊन फसवणूक केली (Cheating Fraud Case). हा प्रकार स्वारगेट एस.टी. स्टँड परिसरात आणि शुक्रवार पेठेतील हॉटेलमध्ये 20 फेब्रुवारी ते 8 मे 2024 या कालावधीत घडला आहे.
याप्रकरणी पिडीत 34 वर्षीय महिलेने मंगळवारी (दि.11) स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन विनायक रमेश जाधव Vinayak Ramesh Jadhav (रा. पुणे पूर्ण पत्ता माहित नाही) याच्यावर आयपीसी 376, 420, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत महिला मुळची कोल्हापूर येथील आहे. आरोपी महिलेच्या ओळखीचा आहे.
आरोपी विनायक जाधव याने पिडीत महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला विश्वासात घेऊन स्वारगेट एस.टी स्टँडवर बोलावून घेतले. त्याठिकाणी चारचाकी गाडी घेयची असून त्यासाठी पैशांची गरज असल्याचे सांगितले. तसेच गाडी खरेदीसाठी एक तोळे सोन्याचे दागिने घेतले. त्यानंतर त्याच्या ओळखीच्या लोकांच्या बँक खात्यावर 2 लाख 47 हजार 500 रुपये ट्रान्सफर करुन घेतले. तसेच तुझ्यासोबत आयुष्यभर सोबत राहणार असल्याचे सांगून लग्नाचे आमिष दाखवले. महिलेला शुक्रवार पेठेतील (Shukrawar Peth Pune) एका हॉटेलमध्ये नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध (Physical Relationship) प्रस्थापित केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पिडीत महिलेने स्वारगेट पोलिसांकडे तक्रार दिली. पुढील तपास महिला सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी बावचे करीत आहेत.