बहुजननामा ऑनलाईन – अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leone) नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असते. तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे देखील तिला नेटकऱ्यांकडून ट्रोल करण्यात येते. तर कधी ती सिनेसृष्टीसह तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ही चर्चेत असते. सनीला एक हसतमुख आणि आनंदी राहणाऱ्या अभिनेत्रींमध्ये मोजले जाते. आता पुन्हा एकदा सनी (Sunny Leone) चर्चेत असण्याचे कारण म्हणजे नुकताच एका चाहत्याने केलेल्या अजब मागणीवर सनीने हटके कमेंट केले आहे. सध्या ते सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सनी ही नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांशी संपर्क साधत असते. सनी लिओनीचे अनेक चाहते वर्ग आहेत. तर आता नुकताच पाकिस्तान येथील रहिवासी ए. एम खान यांनी फेसबुक वर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यावर त्यांनी म्हटले की, “जर सनी लियोनीने मला रिप्लाय केला तर मी सिगारेट सोडेल”. त्याची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर या पोस्टवर अनेकांनी मजेशीर प्रतिक्रिया देखील दिल्या होत्या.
त्याच्या या पोस्टला चक्क सनी लिओनीने कमेंट करत म्हटले की, “मग तू सिगारेट केव्हा सोडतो आहेस”.
सनीच्या या कमेंटने ए. एम खान हा चकित होऊन पुन्हा त्या कमेंट वर म्हणाला, “आश्चर्यकारक…. धन्यवाद
तू प्रतिक्रिया दिल्याबद्दल”. सध्या याचा स्क्रीन शॉट सर्वत्र शेअर केला जात आहे आणि पुन्हा एकदा सनी
(Sunny Leone) चर्चेचा विषय बनली आहे. सध्या सोशल मीडियावर अशा प्रकारे आपल्या आवडत्या व्यक्तीला टॅग करण्यासाची ट्रेंड देखील जोरात वायरल होत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Sunny Leone | sunny leone replied to a fan comment who want to quit smoking actress said
हे देखील वाचा :
Aditi Tatkare | सभागृहात सत्ताधारी पक्षाचे लोकच कामकाजात खोडा घालत आहेत – अदिती तटकरे