बहुजननामा ऑनलाईन – शाहरूख खानचा ‘पठाण’ हा चित्रपट चांगलाच वादात अडकला असतानाच आता अभिनेता शाहरूख खानची मुलगी सुहाना खान (Suhana Khan) देखील एका नव्या कारणामुळे सोशल मिडीयावर ट्रोल झाली आहे. शाहरूख खानची लेक सुहाना खान (Suhana Khan) ही पुढच्या वर्षी बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार असून तिचा ‘द आर्चीज’ हा सिनेमा घेऊन ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्याअगोदर ती एका कार्यक्रमादरम्यान आली असता तिच्या चालण्यावरून ती सोशल मिडीयावर ट्रोल झाली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
सुहाना खान (Suhana Khan) ही तिच्या आगामी ‘द आर्चीज’ या चित्रपटाच्या रॅपअप पार्टीसाठी जात असतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओत सुहाना (Suhana Khan) बॉडीकॉन ड्रेसमध्ये चांगलीच हॉट दिसत आहे. मात्र त्या ड्रेसमध्ये चालताना ती थोडीशी अनकम्फर्टेबल दिसत आहे. तिच्या याच ड्रेसमधील चालण्यावरून तिची सोशल मिडीयालर खिल्ली उडवली जात आहे. अनेक ट्रोलर्सनी तिची तुलना मलायका अरोरा हिच्याशी केली आहे.
खूशी कपूरच्या आणि सुहाना खानच्या या व्हिडीओवर कमेंट करताना अनेकांनी त्यांना ट्रोल केले आहे. एका ट्रोलरने तिच्या फोटोवर कमेंट करत लिहीले आहे की, ‘ही मलायकासारखी का चालतेय?’ तर आणखी एकाने लिहिलं आहे की, “भविष्यातली मलायका” त्याचबरोबर काहींनी खुशी कपूरची तुलना दीपिका पदुकोणशी देखील केली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
दरम्यान या स्टार किड्सचा आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन झोया अख्तर यांनी केले आहे.
तसेच सुहाना खानसोबत (Suhana Khan) या चित्रपटात अगत्स्य नंदा, खुशी कपूर, मिहीर अहूजा, वेदांग रैना,
युवराज मेंडा यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. हा सिनेमा २०२३ मध्ये नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.
हा चित्रपट हा कॉमिक बुकमधील पात्र आर्ची अँन्ड्यूज आणि त्याचे मित्र यांवर आधारीत आहे.
या चित्रपटातून दिग्दर्शक झोया अख्तरने या कॉमिक बुकमधील पात्रांना भारतीय लूक देण्याचा प्रयत्न केला आहे.
Web Title :- Suhana Khan | suhana khan got trolled for walk like malaika arora video viral
हे देखील वाचा :
Pune Pimpri Accident | मोबाईलवर बोलत दुचाकी चालवणं बेतलं जिवावर, अपघात होऊन तरुणाचा मृत्यू
Rohit Pawar | सभागृहात ऊर्जामंत्र्यांच्या भाषणालाच वीज गेली आणि रोहित पवारांनी लगावला खोचक टोला