बहुजननामा ऑनलाइन टीम – लिंबाचे आपल्या आरोग्याला अनेक फायदे होतात हे सर्वांनाच माहित आहे. उन्हाळ्यात लिंबू सरबत जास्त पिलं जातं. लिंबाचे अनेक आरोग्यदायी( constant dandruff) फायदे आहेत.
अनेकांना कोंड्याची समस्या असते. जर तुम्हीही यामुळं त्रस्त असाल तर कोंड्यासाठी लिंबाचा कसा फायदा होतो आणि याचे इतर फायदे कोणते आहेत याबद्दल आपण माहिती घेणार आहोत.
लिंबाचे फायदे पुढील प्रमाणे –
1) दातातून रक्त येत असेल तर लिंबाच्या रसात साखर घालून त्याचं सेवन करावं.
2) पोटात जळजळ होत असल्यास कमी होते.
3) शरीरावर सतत खाज येत असेल तर ती कमी होते. त्यासाठी 2 चमचे खोबरेल तेलात एक चमचा लिंबाचा रस घालून सर्व अंगाला चोळून मग गरम पाण्यानं अंघोळ करावी.
4) लघवी साफ होते.
5) केसांची चमक वाढते.
6) केसगळती होत असल्यास किंवा डोक्यात कोंडा असेल तर 2 चमचे खोबरेल तेल, एक चमचा लिंबाचा रस आणि दोन कपराच्या वड्यांची पावडर एकत्र करून केसांच्या मुळाशी चोळून लावावं. 2 तासांनी केसं धुवावे.
7) वजन कमी होतं.
8) अपचन झाल्यास लिंबूपाणी प्यावं.
9) आजारपणात तोंडाची चव गेल्यास लिंबाच लोणचं खावं.
टीप – वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये. काही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.