बहुजननामा ऑनलाईन
एका संशोधनातून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. चिंता, नैराश्य, झोप न येणं अशा शरीराशी निगडीत असलेल्या गोष्टींवर उपचार करण्यासाठी गांजाचा वापर केला जात असल्याची माहिती आहे. खास करून पौढ मंडळी याचा वापर करत असल्याचं आढळून आलं आहे.
निद्रानाश, चिंता, वेदना तसंच नैराश्य अशा गोष्टींवर उपचार म्हणून गांजाचा वापर करण्यात येत असल्याची माहिती कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या सॅन डिएगो स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी दिली आहे. अमेरिकन जेरियास्ट्रीक्स सोसायटीच्या जर्नलमध्ये हा रिसर्च ऑनलाईन प्रकाशित करण्याता आला आहे. काही प्रमाणात आरोग्यासाठी फायदेशीर असलेल्या गांजाचा वापर हा अनेक ठिकाणी केला जात आहे. या रिसर्चसाठी 568 रुग्णांचं सर्वेक्षण करण्यात आलं आहे.
‘निद्रानाश, नैराश्य आणि चिंता या कारणांसाठी गांजाचा वापर’
सर्वेक्षण करण्यात आलेल्या रुग्णांपैकी जवळपास 15 टक्के लोकांनी गेल्या 3 वर्षात गांजाचा वापर केला होता. तर त्यातील निम्मे वापरकर्ते नियमितपणे गांजा आरोग्यासाठी उपयुक्त ठरत असल्यानं त्याचा वापर करत होते. वेदना, निद्रानाश आणि चिंता या कारणांसाठी गांजाचा वापर करणं ही सर्वात सामान्य कारणं होती अशी माहिती क्रिस्तोफर कॉफमन यांनी दिली आहे. क्रिस्तोफर हे युसी सॅन डिएगो मेडिसिन विभागातील जेरियाट्रीक्स आणि जेरंटोलॉजी विभागाचे अभ्यासक आणि सहाय्यक प्राध्यापक आहेत.
‘व्यसन म्हणून नाही तर आरोग्याशी संबंधित आजारांवर उपयुक्त’
10 आठवड्यांच्या कालावधीत युसी सॅन डिएगो हेल्थ येथील सिनियर्स क्लिनिक फॉर सिनियर्स क्लिनिकमध्ये हे सर्वेक्षण केले गेले. गांजाचा वापर करणाऱ्या 61 टक्के रुग्णांनी वयाच्या 60 व्या वर्षानंतर त्याचा वापर करण्यास सुरुवात केल्याची माहिती मिळत आहे. गांजाचं सेवन करणाऱ्या काही मंडळींनी व्यसन म्हणून नाही तर आरोग्याशी संबंधित आजारांवर हे उपयुक्त ठरत असल्यानं याचा वापर केल्याची माहिती दिली आहे. एका इंग्रजी वेबसाईटनं याबाबत वृत्त दिलं आहे.