नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – जगातील प्रतिष्ठित कुटुंबातील एक मुलगी पॉर्नस्टार बनण्याची परवानगी मागतेय. वडिल सुमारे 2500 कोटींचा मालक असताना मुलीच्या मनात अशा प्रकारचे विचार कसे काय येऊ शकतात? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबाबतचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्र ’द सन’ने दिलंय.
प्रसिद्ध, श्रीमंत कुटुंब आणि वडील 100 प्रभावशाली व्यक्तींपैकी एक आहेत. त्यांची सुमारे 2500 कोटी रुपयांची त्यांची संपत्ती आहे. अशा कुटुंबाचा सदस्य किंवा होणे सन्मानाची आणि चांगली बाब आहे. मात्र, कोणाला काय आवडेल? आणि काय करावे, हे सुचेल याचं काही सांगता येत नाही, बरोबर ना…? अशाच एका कुटुंबीयातील एक मुलगी पॉर्नस्टार होऊ इच्छिते.
मिकेला स्पिलबर्ग असं या मुलीचं नाव आहे. 24 वर्षाची मिकेला हॉलीवूडचे चित्रपट डायरेक्टर स्टीवन स्पिलबर्गची मुलगी आहे. स्टीवन स्पिलबर्ग यांनी ऑस्कर पुरस्कार जिंकणारे 11 चित्रपट बनवलेत. 1993 साली आलेल्या ‘ज्यूरासिक पार्क’ चित्रपटाने जगभरातील रिकॉर्ड तोडले होते. स्टीवन यांच्याकडे 2500 कोटी रुपयांची संपत्ती असून त्यांच्या पत्नी केट कॅपशॉ माजी अभिनेत्री आहे, असे असताना त्यांच्या मुलीला पॉर्न इंडस्ट्रीमध्ये का जावसं वाटतं?, असा प्रश्न अनेकांना पडत आहे.
मिकेला, स्टीवन आणि कॅपशॉ यांची मुलगी नाही. त्यांनी 1996 मध्ये अफ्रीकी मूळ असणार्या मिकेला हिला दत्तक घेतलं होतं. स्टीवन स्पिलबर्ग यांनी दोनदा लग्न केलंय. त्यांचे पहिले लग्न अभिनेत्री एमी इरविंगसोबत 1985 मध्ये झाले होते. त्यांना मॅक्स नावाचा एक मुलगा आहे. 1989 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला, त्यानंतर स्टीवन यांनी 1991 मध्ये अभिनेत्री केट कॅपशॉ यांच्याशी लग्न केलं. जेव्हा केट आणि स्टीवन यांचे लग्न झाले, तेव्हा केट यांना पहिल्या पतीकडून एक 15 वर्षाची मुलगी झाली होती. केट यांनी लग्नापूर्वी एका आफ्रीकी मूळ असणार्या मुलाला दत्तक घेतलं होतं. स्टीवन आणि केट यांना एक मुलगी झाली तिचे नाव सशा असे होते.
स्वत:ची तसेच सावत्र मुले असतानाही स्टीवन यांनी 1996 साली मिकेला हिला दत्तक घेतले. 2020 मध्ये स्पिलबर्ग आणि केट यांना कळालं की, त्यांची मुलगी पॉर्न इंडस्टीमध्ये काम करतेय. त्यावेळी त्यांना मोठा झटका बसला.
मिकेला आपल्या आई-वडिलांपासून दूर टेनेली राज्यामध्ये राहते. मिकेलाला हॉलीवूडच्या पारंपरिक चित्रपटात रस नाही. तिने अनेक कामं केली, पण ती स्वत:च्या पायावर उभी राहू शकली नाही. त्यांनतर तिने आपलं नशीब पॉर्न इंडस्ट्रिमध्ये आजमावण्याचं ठरवलंय. तिने सुरुवातीला सोलो अडल्ट व्हिडिओ बनवलेत. पण, पॉर्न एक्ट्रेसचे लाईसेंस न मिळाल्याने तिला हे व्हिडिओ वेबसाईटवरुन काढून टाकावे लागले होते. त्याचमुळे ती आता लाईसेंस मिळवण्यासाठी प्रयत्न करतेय.
एका मोठ्या कलाकाराची मुलगी असतानाही मिकेला पॉर्न इंडस्ट्रित आपले करियर करायचे आहे, यावर तीही ठाम आहे. अनेकांनी तिचे मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. पण, ती स्वत:च्या निर्णयावर ठाम आहे.