बहुजननामा ऑनलाईन – राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी इयत्ता 10 आणि 12 वीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याची घोषणा सोमवारी (दि. 12) केली. गायकवाड यांनी आपल्या ट्विटर हँडलवर देखील याबाबत ट्विट केले होते. पण त्यांनी केलेल्या ट्विटमध्ये वापरलेल्या #PariskhaPeCharcha हॅशटॅगवरुन संभ्रम निर्माण झाला आहे. पंतप्रधान मोदीनी विद्यार्थ्यांसोबत परीक्षा पे चर्चा अंतर्गत संवाद साधला होता. त्यावेळी वापरलेला हा हॅशटॅग आता गायकवाड यांनी का वापरला असावा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
राज्यातील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्याची परिस्थिती परीक्षेसाठी योग्य नाही. विद्यार्थ्यांचे आरोग्य ही आमची प्राथमिकता असल्याचे ट्विट गायकवाड यांनी केले होते. पण त्या ट्विटसोबत #PariskhaPeCharcha हा हॅशटॅग वापरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीनी देशातील विद्यार्थ्यांसोबत परीक्षा पे चर्चा अंतर्गत संवाद साधला होता. मोदींच्या या कार्यक्रमाच्या कॅम्पेनसाठी #PariskhaPeCharcha हा हॅशटॅग वारण्यात आला होता. त्यामुळे मोदींच्या कॅम्पेनसाठी वापरलेला हॅशटॅग गायकवाड यांनी राज्यातील शालेय परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या घोषणेसाठी का वापरला असावा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अर्थात तो चुकून वापरलाय की हा हॅशटॅग अलीकडेच ट्रेंडमध्ये आल्याने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने वापरला आहे, याबद्दल त्याच सांगू शकतील.