बहुजननामा ऑनलाईन टीम : सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Siddharth Malhotra-Kiara Advani) यांच्या लग्नाविषयी. प्रत्येक ठिकाणी या दोघांच्याच लग्नबाबत (Married) बातमी समोर येत होत्या. आता मात्र प्रतीक्षा संपली असेच म्हणावे लागेल. कारण सिद्धार्थ आणि कियाराच्या (Siddharth Malhotra-Kiara Advani) लग्नाची सगळ्यात महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कियारा आणि सिद्धार्थ यांनी त्यांच्या लग्नाचे ठिकाण फायनल केले आहे.
याआधी सिद्धार्थ आणि कियारा (Siddharth Malhotra-Kiara Advani) यांचे लग्न गोव्यात (Goa) पार पडणार अशी चर्चा होती. परंतु सिद्धार्थचे पंजाबी कुटुंब मोठे असल्याने त्यांनी लोकेशन रद्द केले आणि आता अशी बातमी समोर आली आहे की, कियारा आणि सिद्धार्थ यांचे लग्न चंदिगड (Chandigarh) मध्ये ओबेरॉय सुखविला स्पा (Oberoi Sukhavilla Spa) आणि रिसॉर्टमध्ये होणार आहे. याच ठिकाणी राजकुमार राव (Rajkumar Roy) आणि त्यांची गर्लफ्रेंड पत्रलेखा (Patralekha) यांचे लग्न झाले होते. कियारा आणि सिद्धार्थ यांच्या लग्नाबाबत विविध शोजमधून बातमी समोर आली होती मात्र आता यांच्या लग्नाचे ठिकाण पक्के झाल्यानंतर या गोष्टीला दुजोरा मिळाला आहे.
कियारा शेवटी ‘जुग जुग जिओ’ या चित्रपटात दिसली होती.
तर आता कियारा ‘गोविंदा मेरा नाम’ आणि ‘सत्य प्रेम की कथा’ या चित्रपटात काम करताना दिसणार आहे.
तर सिद्धार्थ मल्होत्रा हा नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘थँक गॉड’ या चित्रपटात झळकला होता. तर आता सिद्धार्थ मल्होत्रा ‘योद्धा’ आणि ‘मिशन’ मधून चित्रपटात काम करताना दिसणार आहे.
Web Title :- Siddharth Malhotra-Kiara Advani | siddharth malhotra kiara advani will get married at chandigarh
हे देखील वाचा :
CM Eknath Shinde | ‘…पण उद्धव ठाकरेंनी आमचं ऐकलं नाही’, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला खुलासा