बहुजननामा ऑनलाईन – Shriya Pilgaonkar | मराठमोळी अभिनेत्री श्रिया पिळगावकर तिने तिच्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. ‘गिल्टी माइंड्स’ या वेब सिरीज मध्ये तिने एका वकिलाची भूमिका साकारली होती. तर ‘द ब्रोकन न्यूज’मध्ये एका न्यूज रिपोर्टरची भूमिका निभावली होती. आता श्रियाची नवीन वेब सिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये तिने आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपैकी अगदी विरुद्ध भूमिका साकारणार आहे. ‘ताजा खबर’ या नव्या वेब सिरीजचे नाव असून ती या वेब सिरीज मध्ये एका सेक्स वर्करची भूमिका साकारणार आहे. (Shriya Pilgaonkar)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
ताजा खबर ही वेब सिरीज डिज्नी प्लस हॉटस्टार वर रिलीज होणार आहे. 6 जानेवारी 2023 ला या सिरीजचे सगळे एपिसोड प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या सिरीज मध्ये श्रिया एक वेगळ्याच भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. नुकताच श्रियाने या वेब सिरीजचा प्रोमो तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केला आहे. या प्रोमो मध्ये श्रियाला पाहून प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. (Shriya Pilgaonkar)
याआधी नुकतीच श्रिया तिच्या ऑस्ट्रेलिया ट्रिप मध्ये बिझी असल्याचे दिसून आले. तिने तेथील काही फोटोज आणि व्हिडिओज देखील शेअर केले होते. जे सोशल मीडियावर चाहत्यांना फारच आवडल्याचे दिसत होते. फोटो आणि व्हिडिओ शेअर करत तिने नमूद केले होते की याआधी तिच्या आजोबांसोबत ती ऑस्ट्रेलियाला गेली होती त्यानंतर आता अनेक वर्षांनी ती पुन्हा ऑस्ट्रेलियाला गेली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Shriya Pilgaonkar | shriya pilgaonkar play prostitute worker role in upcoming web series taaza khabar
हे देखील वाचा :
SBI Interest Rate | एसबीआयच्या व्याजदरात कमालीची वाढ
Pune Crime | ‘तु मला भाई म्हणत नाही’ तरुणाला कोयत्याचा धाक दाखवून ब्लेडने वार, हडपसर परिसरातील घटना
Horoscope 2023 | राशिफळ 2023 : ‘या’ 6 राशींचे 2023 मध्ये बदलणार भाग्य, नोकरीमध्ये होईल जबरदस्त फायदा