परभणी : बहुजननामा ऑनलाइन – Shivsena MP Sanjay Jadhav Car Accident News | परभणीतील (Parbhani) शिवसेनेचे (Shivsena) खासदार संजय जाधव (MP Sanjay Jadhav) यांच्या गाडीला मोठा अपघात (accident) झाला आहे. एका बैठकीवरून माघारी परतत असताना हा अपघात झाला आहे. यामध्ये खासदार जाधव यांच्या स्कॉर्पिओ गाडीची आणि एका कारची समोरासमोर धडक झाली. सुदैवाने या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या अपघातात दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. (Shivsena MP Sanjay Jadhav Car Accident News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
काय घडले नेमके ?
खासदार संजय जाधव (MP Sanjay Jadhav) हे जिल्हाधिकारी कार्यालयात कामानिमित्त आले होते. कार्यालयातील काम उरकल्यानंतर ते जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर पडत असताना त्यांच्या गाडीचा अपघात झाला. स्कॉर्पिओ आणि आय ट्वेन्टी कारची समोरासमोर धडक झाली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
जिल्ह्याच्या खासदाराच्या गाडीचा अपघात झाल्याचे समजताच लोकांची त्या घटनास्थळी मोठ्या गर्दी निर्माण झाली.
या दोन्ही गाड्या कमी वेगात असल्यामुळे आतील माणसांना कसलीही हानी पोहोचली नाही.
या अपघातानंतर क्रेनच्या मदतीने संजय जाधव
यांची स्कॉर्पिओ गाडी रस्त्यावरून हटवण्यात आली. या अपघातामुळे काही काळ रस्त्यावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
Web Title :- shivsena mp sanjay jadhav car accident in front of parbhani collector office
हे देखील वाचा :
Diabetes Diet | ब्लड शुगरच्या रुग्णांनी कोणत्या डाळी, भाज्या खाव्यात आणि कोणत्या टाळाव्या? पहा यादी