बहुजननामा ऑनलाईन टीम – कायमच काँगेसचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर यांच्या ट्विटची चर्चा असते. शशी नेहमीच चालू घडामोडींवर भाष्य करणारेच ट्विट करत असतात. थरूर यांनी नुकतेच एक ट्विट केले आहे ज्यात त्यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांचे काही फोटो शेअर केले आहे.
हे जुने फोटो टाकत थरूर यांनी म्हंटले आहे की, १९५४ मध्ये अमेरिकेतील नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्या स्वागतासाठी आलेली गर्दी पहा. हि गर्दी कोणत्याही पीआर शिवाय आणि कॅम्पेन शिवाय आलेली आहे. विदेशात देशाच्या पंतप्रधानाला मिळणारी प्रसिद्धी हि काही नवीन नाही असे थरूर यांना सांगायचे होते. परंतु या ट्विट मध्ये त्यांच्याकडून एक चूक झाली. अनेकांनी या चुकवर कमेन्ट करत आपले म्हणणे मांडले. एका युजर्सने म्हंटले की, हे फोटो अमेरिकेतील नसून हे फोटो १९५६ मधील मॉस्को मधील आहे.
यानंतर शशी थरूर यांना आपली चूक समजली आणि त्यांनी पुन्हा ट्विट करत म्हणाले, हे फोटो अमेरिकेतील आहेत असे मला सांगण्यात आले होते जरी असे असले तरी ही एक गोष्ट मात्र खोटी नाही की माजी पंतप्रधानांना विदेशात खूपच प्रसिद्धी मिळत असे. जेव्हा नरेंद्र मोदींना सन्मानित केले जाते तेव्हा हा सन्मान भारताला केला जातो.
Visit : bahujannama.com