मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – दिल्लीतून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री (Maharashtra CM) बदलण्याच्या हालचाली सुरु असल्याचा मोठा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केला आहे. यावर शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावरील राऊतांचे वक्तव्य म्हणजे ‘स्वत:चं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून’, अशी टीका शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी केली. ते सोमवारी एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) म्हणाले, मला एक कळत नाही की, संजय राऊत महायुतीत काय सुरु आहे हे कसं काय सांगू शकतात. संजय राऊत अंतरयामी झाले आहेत का? रोज सकाळी उठायचं, तथ्यहीन बोलायचं. मला त्यांना एकच सांगायचं आहे की, संजय राऊतांनी शिंदेंबद्दल केलेलं वक्तव्य म्हणजे ‘स्वत:चं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून’ असं आहे.
मविआत सगळं अलबेल नाही
शंभूराज देसाई पुढे म्हणाले, कालच शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले की, 2024 मध्ये महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) एकत्र लढेल की नाही हे सांगू शकत नाही. ज्यांनी मविआ स्थापन केली त्या शरद पवारांनीच हे मोठं विधान केलं आहे. यावरुन महाविकास आघाडीत सगळं अलबेल नाही हे दाखवतं आहे. याबाबत संजय राऊत काही बोलत नाहीत, मात्र त्यावरुन लक्ष विचलित करण्यासाठी असं काही वक्तव्य करत आहेत.
बहुमत सिद्ध करण्याची हौस असेल तर…
संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah),
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DyCM Devendra Fadnavis) यांना तुमचा मुख्यमंत्री बदलणार आहे
का असं विचारण्यासाठी गेले होते का? आमचं 170 पेक्षा अधिक बहुमत आहे. त्यांना बहुमत सिद्ध करण्याची हौस असेल तर त्यांनी सभागृहाच्या कोणत्याही आयुधाचा वापर करुन विश्वासदर्शक चाचणीची मागणी करावी. आम्ही दोनदा 170 चं बहुमत दाखवलं आहे. आता ते 185 च्या वर जाईल. त्यामुळे राऊतांनी एकनाथ शिंदे यांच्याविषयी अशा प्रकारचे वक्तव्य करण्यात अर्थ नसल्याचे शंभूराज देसाई म्हणाले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Shambhuraj Desai | first reaction of shinde faction on sanjay raut claim about cm eknath shinde
हे देखील वाचा :
Nana Patole | अजित पवार मुख्यमंत्री होणार? नाना पटोले म्हणाले – ‘मोदी है तो मुमकिन है’