नवी दिल्ली : वृत्तसंस्था- जर तुम्ही होम लोन किंवा पर्सनल लोन घेणार असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण आता लोन घेणं सोप झालं आहे. तुम्हाला एका तासापेक्षाही कमी वेळेत सहज लोन मिळू शकतं. तुम्ही PSB loan in 60 Minutes द्वारे कोणत्याही कटकटीशिवाय लोन घेऊ शकता. या प्रकल्पाला तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता स्टेट बँक ऑफ इंडिया, पंजाब नॅशलन बँक, बँक ऑफ बडोदासहित देशातील 10 सरकारी बँकेतून PSB loan in 60 Minutes अंतर्गत लोन घेतलं जाऊ शकतं.
मोदी सरकारने आधीच्या कार्यकाळात नोव्हेंबर 2018 मध्ये MSMEसाठी 59 मिनिटांमध्ये लोन सुविधा सुरु केली होती. याचंच नाव PSB loan in 60 Minutes आहे. या अंतर्गत MSME साठी 5 कोटी रुपयांपर्यंतचं लोन केवळ 59 मिनिटांत पास होतं आणि लोनची अमाऊंट कामकाजाच्या 8 दिवसांत खात्यात जमा होते. ही सुविधा आता होम लोन आणि पर्सनल लोनसाठीही सुरू करण्यात आली आहे.
ऑटो लोनसाठीही ही सुविधा उपलब्ध होणार
झटपट मिळणार लोन- एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार, लवकरच ही सुविधा ऑटो लोनसाठीही सुरू होणार आहे. या सुविधेअंतर्गत ग्राहकांना बँक निवडण्यााठी अनेक पर्याय मिळणार आहेत. यामुळे लोन घेण्याची पूर्ण प्रक्रिया सोपी होणार आहे.
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाचे एमडी पीके गुप्ता यांचं म्हणणं आहे की, 59 minutes portal मधून होम आणि पर्सनल लोनसाठी अर्ज करू शकता.
असे घ्या लोन
-लोनसाठी अप्लाय करण्यासाठी MSME ला https://www.psbloansin59minutes.com/signup वर जावं लागेल.
– येथे अर्जदाराला नाव, ईमेल आयडी, फोन नंबर टाकून OTP जनरेट करावा लागेल. ओटीपी नंतर ही प्रक्रिया सुरु होईल.