मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Sanjay Dutt Injured | सुप्रसिध्द अभिनेता संजय दत्त हा त्याच्या आगामी चित्रपटाची शुटिंग करीत असताना जखमी झाला. त्यास तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (Sanjay Dutt Injured)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अस्सल अभिनय आणि वेगवेगळया दमदार भूमिकेमुळे संजय दत्तने स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केलेली आहे. हिंदी सिनेमातच नव्हे तर त्याने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये चांगलेच नाव कमावले आहे. अलिकडेच संजय दत्त त्याचा कन्नड चित्रपट ‘केडीः द डेविल’चे (KD – The Devil) शुटिंग करत आहे. याच शुटिंगदरम्यान संजय दत्त जखमी झाल्याचे समजते.
Bollywood Actor #SanjayDutt, who is currently shooting for '#KD', a Kannada pan-India movie in surrounding areas of Bengaluru, has been injured while shooting a bomb explosion sequence and suffered injuries on his elbow, hand and face, sources stated.
Photo: File pic.twitter.com/zlk3lBGHzY
— IANS (@ians_india) April 12, 2023
चित्रपटातील एका सीनमध्ये ब्लास्ट झाल्याचे दाखविण्यात येणार आहे. या ब्लास्टमध्ये संजय दत्त जखमी झाला आहे. त्यास तात्काळ रूग्णालयात दाखल (Sanjay Dutt In Hospital) करण्यात आले आहे अशी माहिती समोर आली आहे. संजयला गंभीररित्या दुखापत झाली आहे. त्याच्या हाताचा कोपरा, हात आणि चेहर्याला जखमी झाली आहे. सध्यातरी या चित्रपटाचे चित्रीकरण थांबवण्यात आले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Sanjay Dutt Injured | sanjay dutt gets hurt shooting for kannada movie kd the devil
हे देखील वाचा :
Dr. Baba Adhav | डॉ. बाबा आढाव यांना महाराष्ट्र भूषण देण्याची शिवसेनेची (UBT) मागणी