सांगली : बहुजननामा ऑनलाईन – Sangli Crime | सांगली (Sangli Crime) जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका आईने आपल्या पोटच्या दोन वर्षाच्या चिमुकलीची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेवरून सांगली शहरात मोठी खळबळ उडाली आहे. ज्ञानदा संजय लोकरे (वय, 2 वर्ष) असं त्या मृत चिमुकलीचं नाव आहे. तर, रेवती संजय लोकरे, (वय, 26) असं आरोपी आईचं नाव आहे. या प्रकरणी सांगली संजयनगर पोलीस ठाण्यातील (Sanjaynagar Police Station) पोलसांनी गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपी आईला ताब्यात घेण्यात आले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
याबाबत अधिक माहिती अशी की, ज्ञानदा जन्मतःच गतीमंद आणि मानसिकदृष्ट्या विकलांग असल्याचा राग संशयित आई रेवती संजय लोकरे (Revati Sanjay Lokare) यांना होता. त्यातूनच तिने चिमुकली ज्ञानदाचा (Dnyanada) एका हाताने गळा आणि दुसऱ्या हाताने तोंड दाबून निर्दयीपणे हत्या केली आहे. याप्रकरणी पुढील संजयनगर पोलीस करीत आहेत.
Web Title : sangli crime the mother took the life of 2 year old chimukali a shocking incident in sangli
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Coronavirus | ‘कोरोना’चा उगम झाला ‘त्या’ वुहानमधील 1.10 कोटी रहिवाशांची चीन करणार पुन्हा Test
PM Shram Yogi Man Dhan pension | रोज 2 रुपये जमा करून मिळवा 36000 रुपये पेन्शन, जाणून घ्या डिटेल