बहुजननामा ऑनलाईन टीम : बॉलिवूड स्टार सलमान खान (Salman Khan) चा सिनेमा राधे युअर मोस्ट वॉन्टेड भाई (Radhe: Your Most Wanted Bhai) ची त्याचे चाहते आतुरतेनं वाट पहात आहेत. सलमानचा हा बहुप्रतिक्षित सिनेमा थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. 2021 च्या ईद निमित्त हा सिनेमा रिलीज करण्यासाठी मेकर्सची प्लॅनिंग सुरू आहे. असाही अंदाज लावला जात होता की हा सिनेमा ओटीटीवर रिलीज होणार आहे. यामुळं चाहते नाराज होते की, त्यांना थिएटरमध्ये धमाल करता येणार नाही. परंतु आत सर्व चर्चांना पूर्ण विराम लागला आहे. सिनेमाबद्दल आता अनेक प्रकारची माहिती समोर येताना दिसत आहे.
या सिनेमात लिड रोलमध्ये सलमान खान आहे हे साऱ्यांनाच माहित आहे. परंतु त्याच्या विरोधात एका तगड्या व्हिलनला उतरवण्याचीही तयारी सुरू आहे. अभिनेता रणदीप हुड्डा (Randeep Hooda) याला सलमान खानच्या अपोझिट कास्ट करण्यात आलं आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार रणदीप हुड्डा एका खतरनाक व्हिलनची भूमिका साकारणार आहे. हा एक असा रोल असणार आहे जो अभिनेत्यानं यापूर्वी कधीच केलेला नसेल.
रणदीप एक ड्रग माफियाच्या भूमिकेत असेल जो सनकी आहे. आपल्या कामासाठी तो कोणालाही मारू शकतो. त्याला खूप वाईल्ड दाखवण्यात येणार आहे. असंही समजत आहे की, रणदीपच्या लुक्सवरही खूप काम करण्यात आलं आहे. त्याचे केसंही लांब दाखवण्यात येणार आहेत. त्यानं फिटनेसवरही मेहनत घेतली आहे.
अशीही माहिती आहे की, राधे सिनेमात एक नाही तर अनेक अॅक्शन सीन्स असणार आहेत. सलमान आणि रणदीप यांची थेट टक्कर होताना दिसणार आहे. यातील एक अॅक्शन सीन तर एवढा खास आहे की, त्याला कोरियन टीमनं डिझाईन केलं आहे. ही सारी माहिती समोर आल्यानंतर आता चाहत्यांची सिनेमाबद्दलची उत्सुकता आणखीच वाढली आहे.