मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – चित्रपट भलेही कलाकारांमुळे संस्मरणीय असू शकतात, परंतु टेक्नीशियन आणि सिनेमॅटोग्राफर यांचीही यात महत्त्वाची भूमिका आहे. अश्यातच चित्रपटसृष्टीने ज्येष्ठ सिनेमॅटोग्राफर ईश्वर बिद्री यांना गमावले आहेत. त्यांच्या निधनानंतर अनेक कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
काही वेळापूर्वीच व्यापार विश्लेषक कोमल नहता यांनी ईश्वर बिद्री यांच्या निधनाची माहिती दिली होती. त्यांनी लिहिले, नॉटेड सिनेमॅटोग्राफर ईश्वर बिद्री यांचे निधन झाले. ईश्वर बिद्री यांनी अंदाज अपना अपना, ‘अब के बरस’, ‘कभी कहीं’, ‘और हम कौन हैं’ आणि ‘ढाई अक्षर प्रेम के’ सारख्या बड्या चित्रपटांची सिनेमॅटोग्राफी केली आहे. त्यांच्या निधनाने बॉलिवूडमध्ये शोकांची लाट आहे.
अंदाज अपना अपना मुख्य भूमिकेत आमिर खान, सलमान खान, रवीना टंडन आणि करिश्मा कपूर मुख्य भूमिकेत आहेत. त्यावेळी हा चित्रपट लोकप्रिय होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय केला होता.चित्रपटाच्या रीमेक बद्दल बर्याचदा चर्चाही झाली आहे. अंदाज अपना अपना हा एक विनोदी चित्रपट होता.
महत्त्वाचे म्हणजे सलमान खान आज 55 वर्षांचा झाला. त्याच्या वाढदिवसा दिवशीच त्याच्या चित्रपटाच्या सिनेमॅटोग्राफरचा मृत्यू होणे हीदेखील शोकांची बाब आहे. कोरोनामुळे सलमान खानने आपल्या वाढदिवशी आपल्या चाहत्यांना घराबाहेर न जमण्याची विनंती केली होती. सलमान खानने पनवेलमध्ये फार्म हाऊसवर फोटोग्राफरसमवेत आपला वाढदिवस साजरा केला. सलमान खानला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप यशस्वी झाले आहेत. तो लवकरच राधे यूवर मोस्ट वॉन्टेड भाई या चित्रपटातही दिसणार आहे. याशिवाय तो ‘अंतिम’ या चित्रपटाचेही शूटिंग करत आहे. सलमान खानच्या वाढदिवशी बिग बॉस 14 मध्येही खास तयारी केली गेली आहे.