मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Sakinaka Fire News | मुंबईतील साकीनाका परिसरातील एका दुकानाला लागलेल्या भीषण आगीत दोन कामगारांचा होरपळून मृत्यू (Workers Death) झाल्याची घटना (Sakinaka Fire News) घडली आहे. आगीची ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. ज्यावेळी दुकानाला आग (Shop Fire) लागली त्यावेळी दुकानात 11 कामगार झोपले होते. यातील नऊ कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मिळालेल्या माहितीनुसार, साकीनाका परिसरात असलेल्या राजश्री इलेक्ट्रिक अँड हार्डवेअर (Rajshree Electric & Hardware) या दुकानाला मध्यरात्री दोनच्या सुमारास अचानक आग (Sakinaka Fire News) लागली. दुकानातून आगीचे लोळ उठलेले पाहून स्थानिक नागरिकांनी घटनेची माहिती अग्निशमन दलाला (Fire Brigade) दिली. अग्निमशन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन 11 कामगारांना बाहेर काढले. या घटनेत 2 कामगार होरपळल्यामुळे गंभीर जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. राकेश गुप्ता (वय-22) आणि गणेश देवासी (वय-23) अशी मृत्यू झालेल्या दोन कामगारांची नाव आहेत.
Last night, a fire broke out in a shop near Saki Naka metro station. pic.twitter.com/dnDOEqLcXM
— Chandivali Citizens Welfare Association (CCWA) (@ChandivaliCCWA) March 27, 2023
विझलेली आग पुन्हा भडकली
आग लागल्याची वर्दी मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.
त्यांनी अथक प्रयत्न करुन साडेतीनच्या सुमारास आग नियंत्रणात आणली.
त्यानंतर पाच वाजता पुन्हा आगीचा भडका उडाला. या आगीत दोन दुकानं जळून खाक झाली.
यानंतर पुन्हा काही वेळाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं. त्यानंतर याठिकाणी कुलिंगचे काम करण्यात आले.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
कोट्यवधी रुपयांचे नुकसान
मुंबई अग्निशमन दलाने ही आग लेव्हल-1 असल्याचं घोषित केलं आहे.
दरम्यान, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.
या आगीमध्ये कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालं आहे.
मुंबईतील मोठं हार्डवेअर दुकान म्हणून या दुकानाची ओळख होती.
या आगीत दुकानातील इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक इन्स्टॉलेशन्स आणि इतर साहित्य जळून खाक झालं आहे.
Web Title : Sakinaka Fire News | a fire broke out at a hardware shop in sakinaka area of mumbai death of 2 workers
हे देखील वाचा :