नागपूर बहुजननामा ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि निर्मल समूहाचे अध्यक्ष व कॉंग्रेस नेते प्रमोद मानमोडे यांच्या शुक्रवारी झालेल्या भेटीने राजकिय क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे. मानमोडे यांनी याच महिन्यात कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत मानमोडे यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्याला एक महिनाही झालेला नाही. त्यानंतर त्यांनी शुक्रवारी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
कॉंग्रेसची वंचित सोबत आघाडी व्हावी असा कॉंग्रेसचा मानस आहे. परंतु अद्याप वंचितसोबत त्यांची बोलणी झालेली नाही. तर वंचितने विदर्भानंतर मराठवाड्यात इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या. त्यानंतर आता नागपूरात असताना प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.