बहुजननामा ऑनलाईन – भारतीय रिझर्व बॅंकेने लवकरच १०० रुपयांच्या नोटा प्रसिद्ध होणार असल्याची माहिती दिली आहे.आरबीआयने दिलेल्या आहवालानुसार, प्रायोगिक तत्तवावर वार्निश नोट बाजारात आणली जाईल. विशेष थराच्या या नोटा हातळण्यास सुलभ आणि फाटण्याची शक्यता कमी असणाऱ्या असतील. ज्यामुळे या नोटांची किंमतही वाढेल.
वार्निश नोट म्हणजे नोटेवर एक विशेष प्रकारचा थर लावला जातो. हा थर नोट पटकन फाटू देत नाही की मळतही नाही. याशिवाय या नोटा हाताळण्यासही सोप्या आहेत. वार्निश नोट्स जगातील बर्याच देशांमध्ये वापरल्या जात आहेत, आता भारतातही वार्निश नोट्सने वापराने अस्तित्त्वात असलेल्या नोटांची फाटण्याची समस्या सोडविली जाऊ शकते.
रिझर्व्ह बँकेने दिलेल्या वार्षिक अहवालानुसार नव्याने डिझाइन केलेल्या ५०० रुपयांच्या नोटांच्या नकली नोटांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये मागील वर्षाच्या तुलनेत १२१ टक्के नकली नोटांमध्ये वाढ झाली आहे. या काळात २००० रुपयांच्या नकली नोटा २१.९ टक्क्यांनी वाढल्या आहेत. तसेच, आरबीआयने जाहीर केलेल्या अहवालानुसार 10 रुपयांच्या नकली नोटांमध्ये २०.२ टक्के, २० रुपयांच्या नकली नोटांमध्ये ८७.२ टक्के आणि ५० नकली नोटांमध्ये ५७.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच, १०० रुपयांच्या नकली नोटांच्या छपाईत ७.५ टक्क्यांनी घट झाली असल्याचे आढळून आले आहे. दरम्यान १ जुलै, २०१८ ते ३० जून २०१९ या काळात नोटांच्या छपाईत एकूण ४८.११ अब्ज रुपये खर्च झाले, त्या तुलनेत गेल्या वर्षी ४९.१२ अब्ज रुपये खर्च झाले होते.