नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बिहारचे पोलिस प्रमुख म्हणजेच डीजीपी गुप्तेश्वर पांडे नेहमीच चर्चेत असतात. या वेळीही त्याचा एक व्हिडिओ चर्चेत आहे, ज्यामध्ये ते गोळ्या झाडतांना दिसत आहे. हा व्हिडीओ बिहारमधील डेहरीचा आहे जिथे डीजीपी फायरिंग रेंजमध्ये गोळ्या मारतांना दिसत आहे.
इन्सास रायफलने डीजीपीने केली फायरिंग
इन्सास रायफलमधून डीजीपीने केवळ एक, दोन, तीन नव्हे तर पाच गोळ्या झाडल्या पण त्यांची एकही गोळी निशाण्यावर लागली नाही. वास्तविक या महिन्याच्या १० फेब्रुवारीपासून ‘ऑल इंडिया पोलीस शुटींग कॉम्पिटीशन’ रोहतासच्या डेहरीमध्ये होणार आहे. या स्पर्धेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी डीजीपी गुप्तेश्वर पांडे स्वत: केंद्रावर पोहोचले होते. त्यांनी फायरिंग रेंजचे पाहणी केली व नंतर स्वत: रायफलने निशाणा साधण्याचा प्रयत्न केला.
पोलिस प्रमुखांनी किती स्कोअर केले ?
डीजीपीच्या ५ पैकी ३ गोळ्या निशाण्यावर आदळल्या परंतु दोन गोळ्यांचा निशाणा चुकला. यावेळी, डीजीपीने लॉग रेंज आणि शॉर्ट रेंज या दोन्ही ठिकाणी गोळीबार केला. पहिला, तिसरा आणि चौथा शॉट्स निशाण्यावर लागला, तर दुसर्या आणि पाचव्या शॉट्स निशाण्यावर लागले नाहीत. या वेळी रोहतासचे एसपी सत्यवीर सिंग यांच्या व्यतिरिक्त बिहार पोलिसांचे सर्व मोठे अधिकारी उपस्थित होते.
१ फेब्रुवारी ते १५ फेब्रुवारी दरम्यान ‘ऑल इंडिया पोलीस शुटींग कॉम्पिटीशन’ घेण्यात येणार आहे
डेहरीच्या या शुटींग रेंजवर राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये देशातील ३० पेक्षा अधिक पोलीस टीम सहभागी होणार आहेत. यामध्ये देशातील सर्व राज्यांसह सीआरपीएफच्या टीमसुद्धा सहभागी होणार आहेत. यादरम्यान अनेक स्पर्धा होणार आहेत. आयजी मुख्यालय कमल किशोर यांनी सांगितले की, बिहारमध्ये प्रथमच अशा प्रकारच्या पोलीस स्पर्धा होत आहेत. या सहा दिवसांच्या स्पर्धांच्या दरम्यान पोलिसांचे लक्ष डेहरीवर राहणार आहे. या तयारीचा आढावा घेतानाच डीजीपींना स्वत: फायरिंग केली.