बहुजननामा ऑनलाईन – Ravrambha | मराठी चित्रपटसृष्टीत सध्या ऐतिहासिक चित्रपटांवर जास्त जोर दिल्याचे पाहण्यात येत आहे. ‘शिवप्रताप गरुड झेप’, ‘हर हर महादेव’ या चित्रपटानंतर आता अजून एक ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव आहे ‘रावरंभा’ आत्ता या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे, तर प्रेक्षकांना आता या चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. या चित्रपटामध्ये झी मराठीवरील ‘तू तेव्हा तशी’ मालिकेतील अभिनेता ऐतिहासिक भूमिकेत दिसणार आहे. (Ravrambha)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
रावरंभा हा चित्रपट 7 एप्रिल 2023 ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच पूर्ण झाले आहे. चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज होत आहे, तर नुकताच या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. मात्र, अद्यापतरी रावरंभा कथा काय आहे? कोण कोण कलाकार आहेत? हे मात्र समोर आले नाही. एवढे मात्र नक्की की हा चित्रपट स्वराज्याचे दुसरे सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या चरित्रावर आधारित आहे. (Ravrambha)
या चित्रपटाचे दिग्दर्शन अनुप जगदाळे यांनी केले आहे. सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या भूमिकेमध्ये हिंदी मराठी सिनेमांमध्ये आपली छाप उमटवणारे अभिनेते अशोक समर्थ दिसणार आहेत. या चित्रपटाचे पोस्टर शेअर करत त्यावर म्हटले की, “निधड्या छातीवरती हे, शिवतेज तळपते, गुजर कुळीचे नाव उजळते हे तलवारीचे पाते” अशी जोशपूर्ण ओळ लिहिली आहे, तर या पोस्टरमध्ये प्रतापराव गुजर यांना चारही बाजूंनी शत्रूने घेरलेले आहे आणि ते शत्रूवर तुटून पडताना दिसत आहेत.
झी मराठीवरील ‘तू तेव्हा तशी’ या मालिकेत नुकतेच अशोक समर्थ हे झळकले होते.
त्यांनी त्यांच्या खलनायकी भूमिकेच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती,
तर याआधी प्रेक्षकांनी त्यांना पोलिसांच्या भूमिकेतदेखील पाहिले होते,
तर आता एक वेगळ्याच ऐतिहासिक भूमिका अशोक समर्थ हे पहिल्यांदाच साकारणार आहेत.
त्यांना पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक झाल्याचे दिसत आहेत,
तर लवकरच या चित्रपटातील प्रत्येक पात्र रसिकांसमोर येणार असून रावरंभा हा भव्य दिव्य ऐतिहासिक चित्रपट आहे.
या चित्रपटाची कलाकृती पाहण्यासाठी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Ravrambha | tu tevha tashi fame actor ashok samarth new historical movie ravrambha poster release
हे देखील वाचा :
Pune Crime | तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न, धायरीतील घटना
Pune Crime | सूसमध्ये अतिक्रमण विभागाच्या गाडीवर दगडफेक