मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – अन्विता दत्त (Anvita Dutt) यांचा काला हा चित्रपट (Qala Movie) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात बाबिल खान (Babil Khan) आणि स्वस्तिका मुखर्जी (Swastika Mukherjee) हे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट एक सायकॉलॉजिकल ड्रामा (A psychological drama) आहे. मागच्या काही दिवसांपासून चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात होते. या चित्रपटाच्या अगोदर अन्विता दत्त यांचा बुलबुल (Bulbul) हा चित्रपट हीट ठरला होता. अन्विता दत्त यांचे चित्रपट नेहमीच धमाल करत असतात. त्यामुळे हा चित्रपट (Qala Movie) हिट होतो का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
बॉलीवूडचे (Bolywood) प्रसिद्ध अभिनेते इरफान खान (Irfan Khan) यांचा मुलगा बाबिल खान या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. बाबिल खान या चित्रपटातून लोकांच्या मनावर छाप पाडण्यात यशस्वी होतो का ते पाहणे महत्वाचं ठरणार आहे. हा चित्रपट 1 डिसेंबरला रिलीज होणार आहे. हा चित्रपट Netflix वर पाहता येणार आहे. काला या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यासोबतच चित्रपटाची डेटसुद्धा जाहीर करण्यात आली आहे.
या चित्रपटाची (Qala Movie) स्टोरी एका युवा गायिकेवर आधारित आहे.
ही युवा गायिका कशाप्रकारे यशाच्या शिखरावर पोहचते हे दाखवण्यात आले आहे.
काला चित्रपटाची दिग्दर्शिका अन्विता दत्त यांनी या चित्रपटाचा मुख्य कलाकार म्हणून बाबिलची निवड केली आहे.
बाबिल खानचे नाव सुरुवातीपासूनच या चित्रपटाशी जोडले गेले होते.
आता Netflix वर काला हा चित्रपट काय धमाका करतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
बाबिल खानमुळे चित्रपटाची जास्त चर्चा होताना दिसत आहे.
या चित्रपटात बाबिल नेमकी कोणती भूमिका पार पाडत आहे हे मात्र अजून समजू शकलेले नाही.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Qala Movie | babil khans film qala will release on this day
हे देखील वाचा :