पुणे : बहुजननामा ऑनलाइन – राज्यातील पहिलीपासूनच्या शाळा 1 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. मात्र, मुंबई, पुणे शहरातील स्थानिक प्रशासनानं याला विरोध दर्शवला होता. त्यानुसार पुण्यातील शाळा 15 डिसेंबरपर्यंत सुरु (Pune School Reopan) न करण्याचा निर्णय पुणे महापालिकेने (Pune Corporation) घेतला होता. मात्र आता पुणे महापालिकेने पुण्यातील 1 ली ते 7 वीचे वर्ग गुरुवार दि. 16 डिसेंबर पासून सुरु (Pune School Reopan) करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती महापौर मुरलीधर मोहोळ (Mayor Murlidhar Mohol) यांनी दिली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शाळा सुरु (School Reopen) करण्यासंदर्भात पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar), महापौर मुरलीधर मोहोळ आणि महापालिका आयुक्त विक्रम कुमार (Municipal Corporation Commissioner Vikram Kumar), विभागीय आयुक्त सौरभ राव (Divisional Commissioner Saurabh Rao) यांच्या बैठक झाली. या बैठकीत पुण्यातील शाळा 16 डिसेंबरपासून सुरु (Pune School Reopan) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. (Pune School Reopan)
पुण्यातील १ ली ते ७ वीचे वर्ग गुरुवारपासून !
पुणे मनपा हद्दीतील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग येत्या गुरुवारपासून (१६ डिसेंबर, २०२१) सुरु करण्याचा निर्णय आपण घेतला असून याची पालकांनी नोंद घ्यावी. pic.twitter.com/Kvse0mrGeL
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) December 14, 2021
महापौरींनी सांगितले की, देण्यात आलेल्या काही गाईडलाईन्स, मार्गदर्शक सुचने प्रमाणे शाळा सुरु करण्यात येणार आहेत. शाळा सुरु करत असताना शाळांचे निर्जंतुकीकरण करणे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणं याबाबतच्या संबंधितांना सूचना दिल्या असून 16 डिसेंबर पासून पुण्यातील 1 ली ते 7 वीचे वर्ग सुरु करण्यात येणार आहेत.
दरम्यान, राज्य सरकारने 1 डिसेंबरपासून शाळा सुरु करण्याची घोषणा केली होती.
मात्र, पालक संघटना आणि शिक्षण संस्था यांच्यासोबत चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असे माहपौरांनी सांगितले होते. पुणे महापालिका आयुक्त आणि महापौर यांच्यात चर्चा झाल्यानंतर पहिली ते सातवीच्या शाळा 15 डिसेंबरपासून सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
वर्ग सुरु करण्यासाठीची तयारी पूर्ण झालेली होती. मात्र, ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या (Omicron variant) पार्श्वभूमीवर महापालिकेने सावध पवित्रा घेतला होता.
Web Title :- Pune School Reopan | 1st to 7th class in Pune will start from Thursday, information of Mayor Murlidhar Mohol (Video)
LPG Cylinder | एलपीजी सिलेंडर बुकिंगवर 3000 रुपयांपर्यंत कॅशबॅक देतंय, जाणून घ्या स्कीम
John Abraham | जॉन अब्राहमचे इंस्टाग्राम अकाउंट हॅक, हॅकर्सनी हटवल्या सर्व पोस्ट आणि डीपीसुद्धा