पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune RTO Office | मोटार वाहन कर न भरलेल्या व मोटार वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांतर्गत जप्त केलेल्या ५७ वाहनांचा जाहीर ई-लिलाव (Public e-Auction) प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत १३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. (Pune RTO Office)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे, आळंदी रोड कार्यालय व वाघेश्वर वाहनतळाच्या आवारात कार्यालयीन वेळेत वाहने पाहणी करण्यासाठी उपलब्ध आहेत. यामध्ये टुरिस्ट टॅक्सी, बस, हलकी परिवहन वाहने, रिक्षा या वाहनांचा समावेश आहे. लिलावाच्या तारखेपर्यंत वाहन कर भरण्याची संधी राहणार आहे. (Pune RTO Office)
ई-लिलाव होणाऱ्या वाहनांची यादी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या सूचनाफलकांवर व तसेच https://eauction.gov.in/
जाहीर ई-लिलावात ७ ते ९ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत https://eauction.gov.in/
जीसटी धारकांनाच ई-लिलावात सहभागी होता येणार आहे.
प्रादेशिक परिवहन कार्यालयात हलके वाहनास २५ हजार रुपये व
अवजड वाहनास ५० हजार रुपये रकमेचा धनाकर्ष ‘आरटीओ पुणे’ या नावे सादर करावा.
ही वाहने ‘जशी आहेत तशी’ या तत्वावर जाहीर ई-लिलावाद्वारे विकली जातील.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
कोणतेही कारण न देता ई-लिलाव रद्द करण्याचे अथवा तहकुब ठेवण्याचे अधिकार उपप्रादेशिक परिवहन
अधिकारी तथा कराधान प्राधिकारी यांच्याकडे राखून ठेवण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
Web Title :- Pune RTO Office | Public e-auction of 57 vehicles through Pune Regional Transport Office
हे देखील वाचा :