पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune Police MPDA Action | खून, खुनाचा प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे करुन फरासखाना पोलीस ठाण्याच्या (Faraskhana Police Station) हद्दीत दहशत माजविणारा अट्टल गुन्हेगार पवन उर्फ रुद्र युवराज ढिले (वय-22 रा. कुंभार वाडा, कसबा पेठ, पुणे) याच्यावर पुणे पोलीस आयुक्त रितेश कुमार (IPS Ritesh Kumar) यांनी एमपीडीए कायद्यान्वये (Pune Police MPDA Action) स्थानबध्दतेची कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तांची ही 81 वी कारवाई आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आरोपी पवन उर्फ रुद्र ढिले हा फरासखाना पोलीस ठाण्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याने साथीदारांसह कोंढवा, समर्थ, फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत लोखंडी कोयता, तलवार, सत्तुर या सारख्या जीवघेण्या घातक हत्यारांसह खून, खुनाचा प्रयत्न, दुखापत, दंगा, बेकायदेशीर हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे केले आहेत. मागील पाच वर्षात त्याच्यावर 3 गंभीर गुन्हे दाखल आहेत.
आरोपीवर एम.पी.डी.ए कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा प्रस्ताव पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांना
सादर करण्यात आला होता. प्राप्त प्रस्ताव व कागदपत्रांची पडताळणी करुन पोलीस आयुक्तांनी पवन उर्फ रुद्र ढिले
याला एम.पी.डी.ए कायद्यान्वये नागपूर मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
ही कारवाई फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा व गुन्हे शाखा,
पी.सी.बी. चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत बेदरे, पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या पथकाने केली.