पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune PMC Recruitment | पुणे महानगरपालिकेतील दुसर्या टप्प्यातील 445 जागांसाठी घेण्यात येणार्या या नोकरभरतीसाठी आजपर्यंत 8 हजार 774 अर्ज प्राप्त झाले आहेत. भरती प्रक्रियेस थंड प्रतिसाद मिळाला आहे. म्हणून आता नोकरभरती प्रक्रियेस पुन्हा एकदा तब्बल 16 दिवसांची (दि. 30 एप्रिल पर्यंत) मुदतवाढ देण्यात आली आहे. (Pune PMC Recruitment)
पुणे मनपाकडून ऑक्टोबर 2022 मध्ये 448 जागांसाठी पहिल्या टप्प्यात भरतीप्रक्रिया राबविली होती. मनपाने आयबीपीएस संस्थेशी अॅग्रीमेंट करून ती भरतीप्रक्रिया ऑनलाइन पध्दतीने राबविली होती. राज्य सरकारच्या आदेशानुसार नोकरभरतीसाठी ऑनलाइन प्रक्रिया राबविणारी पुणे मनपा ही राज्यातील पहिली महानगरपालिका ठरली. पहिल्या टप्प्यातील भरती प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर आता दुसर्या टप्प्यात 445 जागांसाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. (Pune PMC Recruitment)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पहिल्या टप्प्यातील भरती प्रक्रियेच्या तुलनेत दुसर्या टप्प्यातील भरती प्रक्रियेस एकदम थंड प्रतिसाद मिळाला आहे. अर्ज भरण्यास सुरूवात झाल्यानंतर पहिल्या 18 दिवसांमध्ये फक्त 4 हजार 218 अर्ज आले होते. त्यापैकी 3 हजार 775 अर्ज हे वैध ठरले. दुसर्या टप्प्यातील भरतीसाठी अर्जासाठीची मुदत दि. 28 मार्च 2023 होती. प्रतिसाद कमी आल्याने अर्ज भरण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. आज (दि. 13) अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. आजपर्यंत 8 हजार 774 अर्ज आले आहे. आताही म्हणावा तसा प्रतिसाद न मिळाल्याने पुन्हा एकदा अर्ज भरण्यासाठी 16 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. आता अर्ज दि. 30 एप्रिलपर्यंत भरता येऊ शकतो. अशी माहिती अतिरिक्त आयुक्त रविंद्र बिनवडे (Ravindra Binwade) यांनी दिली आहे.
Web Title :- Pune PMC Recruitment | Pune Municipal Corporation Recruitment: Second time extension, 8774 applications so far
हे देखील वाचा :
Pune ACB Trap | 10 हजाराची लाच घेणारा मावळ तालुक्यातील ग्रामविकास अधिकारी अॅन्टी करप्शनच्या जाळयात