पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune PMC Property Tax | मिळकत करामध्ये ४० टक्के सवलत देण्यासाठी महापालिका १५ नोव्हेंबर पर्यंत ‘पीटी ३’ हा फॉर्म मिळकत धारकांकडून भरून घेणार आहे (PT 3 form PMC). हा फॉर्म महापालिकेच्या Pune Municipal Corporation (PMC) संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला असून त्यासोबत मिळकत धारकच त्या मिळकतीत राहात असल्याचे पुरावे जोडून हा फॉर्म क्षेत्रिय कार्यालयातील मिळकतकर निरीक्षकांकडे अथवा नागरी सुविधा केंद्रात जमा करावा असे आवाहन पुणे महापालिकेच्या मिळकत कर आकारणी व कर संकलन विभागाचे उपायुक्त अजित देशमुख (Ajit Deshmukh PMC) यांनी केले आहे. (Pune PMC Property Tax)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुणे शहरातील नागरिकांना १९६९ पासून असलेली मिळकत करातील सवलत राज्य शासनाने २०१९ पासून बंद केली होती. परंतू नुकतेच राज्य शासनाने कायद्यात आवश्यक ते बदल करून २०२३-२३ पासून ही सवलत पुर्ववत करण्याची घोषणा केली आहे. महापालिकेने २०१९ पासून नव्याने आकारणी करण्यात आलेल्या मिळकत धारकांकडून शंभर टक्के कर आकारणी सुरू केली होती. तसेच महापालिकेच्या सर्वेक्षणांत आकारणी न झालेल्या मिळकतींकडूनही शंभर टक्के आकारणी करण्यात आली आहे. राज्य शासनाने ज्यावर्षी ही सवलत बंद केली अर्थात २०१९ पासूनच ही सवलत पुर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मागील चार वर्षात शंभर टक्के दराने कर भरलेल्यांना पुढील चार वर्षे टप्प्याटप्प्याने अधिकची आकारणी झालेल्या रकमेची वजावट मिळणार आहे. ४० टक्के सवलत घर मालक राहात असल्यास दिली जात असल्याने याची खातरजमा करण्यासाठी मिळकत धारकांना १५ नोव्हेंबरपर्यंत पीटी ३ हा फॉर्म भरून देणे बंधनकारक केले आहे. महापालिकेने पीटी ३ फॉर्म संकेतस्थळावर उपलब्ध करून दिला आहे. (Pune PMC Property Tax)
पीटी ३ फॉर्म कुठे उपलब्ध होणार
propertytax.punecorporation.
महापालिका संपर्क कार्यालय/ क्षेत्रिय कार्यालय/ मुख्य कार्यालय येथील नागरी सुविधा केंद्र किंवा पेठ निरीक्षक/ विभागीय निरीक्षक
जमा कोठे आणि कधी करायचा आहे?
महापालिका संपर्क कार्यालय/ क्षेत्रिय कार्यालय/ मुख्य कार्यालय येथील नागरी सुविधा केंद्र किंवा पेठ निरीक्षक/ विभागीय निरीक्षक यांच्याकडे. १५ नोव्हेंबर २०२३ पुर्वी.
फॉर्मसोबत कोणती कागदपत्र द्यायची ?
* मिळकतीचा वापर स्वत: राहाण्यासाठी करत असल्याबाबत सोसायटीचे नाहरकत पत्र. (सोसायटी असल्यास)
* त्या पत्त्यावरील मिळकतधारकाचे मतदान ओळखपत्र/ पासपोर्ट / वाहनचालक परवाना/ गॅस कार्ड/ रेशनकार्ड.
* पुणे शहरात अन्य ठिकाणी मिळकत असल्यास त्या मिळकतीच्या मिळकतकराच्या बिलाची प्रत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
तरच ४० टक्के सवलतीचा लाभ मिळणार
महापालिकेच्या आदेशानुसार १५ नोव्हेंबरपर्यंत पीटी ३ फॉर्म भरून देणार्या मिळकतधारकांनाच ४० टक्के सवलतीचा लाभ मिळणार आहे. या फॉर्म्सची निरीक्षकांमार्फत पडताळणी करून जागा पाहाणी केली जाणार आहे. खोटी माहीती दिल्याचे आढळल्यास सवलतीचा लाभ मिळणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Web Title :- Pune PMC Property Tax | Pune Municipal Corporation: PT 3 form PMC has been made available by the Municipal Corporation for 40 percent income tax exemption
हे देखील वाचा :
ACB Trap News | लाचलुचपत प्रतिबंधक विभाग : 1 लाखाची लाच घेणारा निरीक्षक अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात
Deepak Kesarkar | मराठी भाषा धोरणाचा मसूदा शासनास सादर; मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर