पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – Pune Pimpri Crime | पोलीस कर्मचारी असलेल्या महिलेच्या पतीने पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार (Sexual Abuse) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा प्रकार पिंपळे गुरव येते 5 जून 2020 रोजी (Pune Pimpri Crime) घडला आहे. याप्रकरणी सव्वादोन वर्षानंतर सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi Police Station) फिर्याद दिली आहे. पोलीस महिलेच्या तक्रारीवरुन पोलिसांनी पतीला अटक (Arrest) केली आहे.
सांगवी पोलिसांनी 37 वर्षाच्या आरोपी पतीवर आयपीसी 354, 323, 506, पॉक्सो कायदा (Pocso Act) कलम 03,04,7,9(घ), 10 नुसार गुन्हा (FIR) दाखल करुन अटक केली आहे. पीडित मुलीच्या आईने (वय-35) बुधवारी (दि.9) याप्रकरणी फिर्याद दिली आहे. (Pune Pimpri Crime)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ही पोलीस कर्मचारी आहे. तर त्यांचा पती खाजगी व्यवसाय करतात. फिर्यादीच्या पतीने त्यांच्या 8 वर्षाच्या मुलीला भाड्याची रुम दाखविण्यासाठी व मुलीला चॉकलेट घेऊन देतो, असे सांगून तिला सोबत नेले. त्यानंतर आरोपीने मुलीसोबत अश्लील चाळे करुन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले, असे फिर्य़ादित नमूद केले आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कदम (PSI Kadam) करीत आहेत.
Web Title :- Pune Pimpri Crime | policewoman child abuse by father a case was registered after twenty two years
हे देखील वाचा :