पिंपरी : बहुजननामा ऑनलाईन – Pune Pimpri Crime | हातात कोयता घेऊन व्हिडिओ (रील) काढून तो सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट करणं एका तरुणाला चांगलेच महागात पडलं आहे. हातात कोयता घेऊन रील बनवणाऱ्या (Pune Pimpri Crime) तरुणाला पिंपरी चिंचवड पोलिसांच्या शस्त्र विरोधी पथकाने (Anti-Arms Squad) बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
शुभम अभिमान जाधव Shubham Bhimana Jadhav (वय-21 रा. गुजर नगर, थेरगाव) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार चंद्रकांत मोतीराम गवारी (Police Constable Chandrakant Motiram Gawari) यांनी वाकड पोलीस ठाण्यात (Wakad Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भारतीय शस्त्र अधिनियम (Indian Arms Act) आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत (Maharashtra Police Act) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार रविवारी (दि.13) दुपारी दोनच्या सुमारास घडला आहे. (Pune Pimpri Crime)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शुभम जाधव याने हातात कोयता घेऊन एक व्हिडिओ तयार केला.
तो व्हिडिओ त्याने इन्स्टाग्रामवर (Instagram) पोस्ट केला. याबाबत शस्त्र विरोधी पथकाला माहिती
मिळाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला रविवारी दुपारी अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून 300 रुपये
किंमतीचा कोयता जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिंगारे (PSI Shingare) करीत आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- Pune Pimpri Crime | Making a video with a Koita in hand is expensive, young arrest
हे देखील वाचा :
CM Eknath Shinde | जितेंद्र आव्हाड यांच्यावर झालेली कारवाई राजकीय सुडापोटी नाही – CM एकनाथ शिंदे