पिंपरी : – Pune Pimpri Chinchwad Crime News | मावळ लोकसभा मतदारसंघासाठी (Maval Lok Sabha) सोमवारी (दि.13) मतदान झाले. घरातील सर्वजण मतदान करण्यासाठी गेल्यानंतर बंद असलेले घर एका चोरट्याने फोडले. चोरट्याने घरातून दोन लाख 37 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. गुन्हा घडल्यानंतर पोलिसांनी अवघ्या बारा तासात सराईत गुन्हेगाराच्या (Criminal On Police Record) मुसक्या आवळल्या आहेत. ही घटना सोमवारी दुपारी उद्यमनगर, पिंपरी येथे घडली. रोहन राणोजी शिंदे (वय-23 रा. विठ्ठलनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्यमनगर मधील श्रृती एन्क्लेव्ह या गृहनिर्माण संस्थेत राहणारे दीपक मुरलीधर वाघमारे हे सोमवारी दुपारी सदनिकेला कुलूप लावून मतदान करण्यासाठी गेले होते. पावणे चार वाजण्याच्या सुमारास ते मतदान करुन घरी परत आले. त्यावेळी घराचे कुलूप तुटलेल्या स्थितीत होते. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता त्यांच्या घरातून 32 ग्रॅम सोन्याचे दागिने, घड्याळ, दोन मोबाईल फोन असा एकूण दोन लाख 37 हजार 900 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीला गेल्याचे आढळून आले.
वाघमारे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला. घटनास्थळ आणि परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता सराईत गुन्हेगार रोहन याने हा गुन्हा केल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याचा शोध घेऊन ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडुन गुन्ह्यात चोरीला गेलेला सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी रोहन याच्यावर यापूर्वी वाहन चोरी व इतर मालमत्ता चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
Hadapsar Pune Crime News | पुणे : तरुणीचा पाठलाग करुन अश्लिल शिवीगाळ, तरुणाला अटक