पिंपरी : – Pune Pimpri Chinchwad Crime News | महाराष्ट्र शासनाने उद्योग उर्जा व कामगार यांच्या संपादनातून जमिनीवरील नोंद कमी करण्याच्या बहाण्याने दोघांनी कबड्डी प्रशिक्षकाची 25 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार 7 सप्टेंबर 2021 ते रविवार (दि.2 जून) या कालावधीत घडली आहे. पागेची तालीम जवळ चिंचवडगाव येथे घडला आहे.
याप्रकरणी उमेश पांडुरंग तांबे (वय 37 रा. रहाटणी ता. हवेली) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात (Chinchwad Police Station) फिर्याद दिली आहे. यावरून सतीश वसंत आगळे व सविता वसंत आगळे यांच्यावर आयपीसी 406, 420, 506, 34 गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे सासरे सतिश निबंळकर यांची सर्वे 158 गाव चिंचवड येथील संपादनातील जमिनीवर राज्य शासनाने उद्योग उर्जा व कामगार अशी नोंद केली आहे. आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन करुन ही नोंद कमी करण्याचे आश्वासन दिले. यासाठी वेळोवेळी असे एकूण 25 लाख रुपये घेतले. मात्र याबाबत मंत्रालयात कोणताही अर्ज केला नाही.
फिर्य़ादी यांनी दिलेले पैसे परत मागितले असता आरोपींनी पैसे देण्यास नकार दिला. फिर्यादी यांनी पैसे परत मिळण्याकरीता आरोपीकडे तगादा लावला असता आरोपींनी फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. आरोपींनी पैसे घेऊन काम न करता आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक झिंजुर्डे करीत आहेत.