पुणे : बहुजननामा ऑनलाइन – पुणेरी पाट्यांमुळे पुणेकर प्रसिद्ध आहेत. सध्या पुण्यात ‘सविता भाभी… तू इथंच थांब!!!’ असं लिहिलेले होर्डिंग दिसत आहेत. हे होर्डिंग गल्ल्यांमध्ये, चौकात आणि रस्त्यांवर लागले आहेत. त्यामुळे ते चर्चेचा विषय ठरत आहे.
शहराच्या मुख्य रस्त्यांवर आणि चौकात हे होर्डिंग लागले असून त्याला काळ्या रंगाचा बॅकग्राउंड असून त्यावर पिवळ्या रंगात ‘सविता भाभी… तू इथंच थांब’ अस लिहिले आहे. सकाळ – सकाळ असे होर्डिंग दिसल्याने पुणेकर आश्चर्यचकित झाले आहेत. हे होर्डिंग म्हात्रे पूल जवळील भागात मोठ्या प्रमाणावर लागेल असताना तरुणांनी ते पाहण्यासाठी गर्दी केली होती.
पुणेकरांना या होर्डिंगचा नेमका अर्थ कळत नसून ते आपापल्या पद्धतीने तर्क लावत आहेत. काहींना ती टीव्ही मालिकेची जाहिरात वाटते तर काहींना ती वेब सीरिजची जाहिरात वाटते. काहींना सिनेमाच्या ऑडिशनची जाहिरात वाटते तर काहींना फॅशन डिजाईनशी संबंधित जाहिरात वाटते.
याअगोदरही असे अनेक होर्डिंग पुणे – मुंबई येथे लावले असता लोकांना त्याचा अर्थ समजण्यास वेळ लागला होता.