पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune News | महावीर जयंती निमित्त पद्मावती नगर जैन संघ येथे प्रख्यात जैन मुनी पूज्य नंदीभूषण महाराज साहेब यांच्या उपस्थितीत पूना हॉस्पिटलचे (Poona Hospital) अध्यक्ष देविचंद जैन (Devichand Jain) व ट्रस्टी राजेश शहा (Rajesh Shah) यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विरेन जैन तसेच मोठ्या संख्येने जैन भाविक उपस्थित होते. (Pune News)
साधारण दोन महिन्यांपूर्वी २२ जून रोजी लोणावळ्याहून कामशेत कडे जात असताना जैन मुनी पूज्य वीरभूषण महाराज साहेब यांचा अपघात झाला होता. या अपघातात वीरभूषण महाराज साहेब गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर तातडीने त्यांना पूना हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अनेक लहान मोठ्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. या कालावधीत त्यांचे धार्मिक पुत्र व जैन मुनी नंदीभूषण महाराज साहेब त्यांची सुश्रुषा करण्यासाठी त्यांच्या सोबत पूना हॉस्पिटल येथे राहिले होते. (Pune News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
साधारण दोन महिने गुरुभगवंत वीरभूषण महाराज साहेब यांच्यावर पूना हॉस्पिटल येथे उपचार सुरु होते.
पूना हॉस्पिटल मधून चांगले होऊन पद्मावती नगर जैन संघ येथे चातुरमास साठी उपास्थित राहून महाराज साहेब धर्माचा प्रचार करीत आहेत.
पूना हॉस्पिटल मध्ये पूज्य वीरभूषण महाराज साहेब यांच्यावर उपचार सुरु असताना पूना हॉस्पिटलचे अध्यक्ष देविचंदजी जैन यांनी स्वत: उपस्तित राहून, शास्त्रक्रिये वेळी सुद्धा स्वतः हजर राहून त्यांना बरे करण्यात मोठा वाटा उचलला आहे.
त्याच प्रमाणे पूना हॉस्पिटलचे डॉक्टर राजन कोठारी व डॉ. अजीत तांबोळकर यांनी त्यांच्यावर उत्तम उपचार केले.
हे उपचार करण्यासाठी हॉस्पिटलच्या सर्व स्टाफने मोलाची साथ दिली.
मुख्य म्हणजे हे उपचार विनाशुल्क करण्यात आले आहेत.
त्याबद्दल पद्मावती नगर जैन संघाच्या वतीने प्रशस्ती पत्रक व शाल माळ देऊन देविचंदभाई जैन यांचा सत्कार करण्यात आला.
अशी माहिती पूना हॉस्पिटलचे ट्रस्टी राजेश शहा यांनी दिली.
Web Title : – Pune News | Poona Hospital Chairman Devichand Jain and Trustee Rajesh Shah and felicitated
हे देखील वाचा :
Pune Crime | खडकी बाजारमधील मटका जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेचा छापा, 10 जण ताब्यात