बहुजननामा ऑनलाइन टीम – दोन दिवसांपूर्वी पिंपरीतील (Pimpri) मुख्य चौकात वाहतूक (Traffic) नियमन करताना वाहतूक शाखेच्या महिला पोलिस कर्मचाऱ्याला थेट खिशात लाच घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (corrupt woman police)झाला. स्वाती सीताराम सोन्नर असे लाच घेतलेल्या महिला पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. या गुन्ह्यात त्यांना निलंबित करण्यात आले आहे. मात्र, त्यांनी दिलेल्या स्पष्टीकरणामध्ये त्यांनी केलेल्या चुकीची कबूली दिलेली नाही.
https://www.facebook.com/186950141883811/videos/400949607795077
लाच घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर स्वाती सोन्नर यांची वरिष्ठांकडून चौकशी झाली. त्यांनी वरिष्ठांकडे यासंदर्भात लेखी खुलासा दिला आहे. यामध्ये त्यांनी पैसे देणारी महिला ओळखीची असून त्यांनी वस्तू खरेदी केली होती त्याचे पैसे मी दिले होते. त्यांनी ते त्या दिवशी परत दिले आहेत, असा खुलासा केला आहे. मात्र, पोलिसांच्या गणवेशात अशाप्रकारे गैरवर्तन केल्याचा ठपका ठेवत त्यांना निलंबित करण्यात आले.
स्वाती यांचा लाच घेतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या वरिष्ठांनी त्यांच्याकडे लेखी खुलासा देण्याचे आदेश दिले. स्वाती यांनी त्यांची चूक कबूल न करता त्या ओळखीच्या असल्याचे सांगत पळवाट काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या या कृत्यामुळे पिंपरी-चिचंवड पोलिसांची प्रतिमा मलिन झाली असल्याने त्यांना निलंबित करण्यात आल्याचे वरिष्ठांकडून सांगण्यात येत आहे.