पुणे : बहुजननामा ऑनलाईन – Pune News | महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विभाग दिव्यांग कल्याण आयुक्तालय व श्री समर्थ व्यायाम मंडळ इंदापूर पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दिव्यांग मुला आणि मुलींच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेच्या धावण्याच्या क्रिडाप्रकारामध्ये पुण्याच्या शिवशंकर जाधव, नागपूरच्या स्वप्निल ढालखंडाईत आणि श्वेता पिल्लेवान, संध्याराणी कदम यांनी अव्वल क्रमांक पटकावला. (Pune News)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
ही स्पर्धा श्री शिवछत्रपती क्रीडा मैदान महाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत १३ ते १६ वयोगटामध्ये मुलांच्या १०० मीटर धावणे प्रकारामध्ये पुण्याच्या शिवशंकर जाधव याने पहिला; परभणीच्या फिरोज पठाण याने दुसरा आणि उस्मानाबादच्या भागेश इस्लामपुरे याने तिसरा क्रमांक मिळवला. १७ ते २१ वयोगटामध्ये १०० मीटर धावणेमध्ये नागपूरच्या स्वप्निल ढालखंडाईत याने पहिला; उस्मानबादच्या रोहीत वाघमारे आणि भंडाराच्या आतिश उके याने तिसरा क्रमांक मिळवला. (Pune News)
१७ ते २१ वयोगटामध्ये मुलींच्या १०० मीटर धावणे प्रकारात नागपूरच्या श्वेता पिल्लेवान हिने पहिला; भंडाराच्या अपेक्षा बोंदरे हिने दुसरा आणि उस्मानाबादच्या मुस्कान बागवान हिने तिसरा क्रमांक मिळवला. १३ ते १६ वयोगटाच्या मुलींच्या ५० मीटर धावणे प्रकारात उस्मानाबादच्या संध्याराणी कदम हिने पहिला, पुण्याच्या सुवर्णा चिमटे दुसरा आणि बीडच्या नम्रता मुळे हिने तिसरा क्रमांक मिळवला.
१७ ते २१ वयोगटातील मुलांच्या पोहणे प्रकारात पुण्याच्या कार्तिक धुपे हिने पहिला, उस्मानाबादच्या खंडू कोळी याने दुसरा आणि परभणीच्या सचिन राठोड यांनी तिसरा क्रमांक मिळवला.
स्पर्धेचा सविस्तर निकालः
मुलेः १०० मीटर धावणेः १३ ते १६ वयोगटः प्रवर्गः अस्थिव्यंग (अ)ः
१. शिवशंकर जाधव (पुणे); २. फिरोज पठाण (परभणी); ३. भागेश इस्लामपुरे (उस्मानाबाद);
मुलेः १०० मीटर धावणेः १७ ते २१ वयोगटः प्रवर्गः अस्थिव्यंग (अ)ः
स्वप्निल ढालखंडाईत (नागपूर); रोहीत वाघमारे (उस्मानाबाद); आतिश उके (भंडारा);
मुलीः १०० मीटर धावणेः १७ ते २१ वयोगटः प्रवर्गः अस्थिव्यंग (अ)ः
श्वेता पिल्लेवान (नागपूर); अपेक्षा बोंदरे (भंडारा); मुस्कान बागवान (उस्मानाबाद);
मुलीः ५० मीटर धावणेः १३ ते १६ वयोगटः अस्थिव्यंग (क)ः
१. संध्याराणी कदम (उस्मानाबाद); २. सुवर्णा चिमटे (पुणे); ३. नम्रता मुळे (बीड);
मुलेः पासिंग द बॉलः ८ ते १२ वयोगटः पूर्णतः अंधः
आयुश वेताळ (पुणे); मयंक बाविस्कर (धुळे); सुरज ओकाशी (सांगली);
मुलीः पासिंग द बॉलः ८ ते १२ वयोगटः पूर्णतः अंधः
तृप्ती राऊत (बुलढाणा); सुजीता पारधी (पालघर); शिवानी राऊत (मुंबई शहर);
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मुलेः उभे राहून लांब उडीः १३ ते १६ वयोगटः पूर्णतः अंधः
गोपेश खोडवे (पुणे); संकेत मेहरे (अकोला); पुनीत कावरे (अमरावती);
मुलीः उभे राहून लांब उडीः १३ ते १६ वयोगटः पूर्णतः अंधः
निकीता वाहिंदे (नांदेड); अंतरा पिपरे (चंद्रपूर); आरूषी फबळे (यवतमाळ);
मुलेः गोळा फेकः १३ ते १६ वयोगटः मतिमंदः
ऋषीकेश उकर (मुंबई उपनगर); दिपक जाधव (सातारा); आकाश पवार (बीड);
मुलेः गोळा फेकः १७ ते २१ वयोगटः मतिमंदः
दीप गोसाळकर (मुंबई उपनगर); अजय सी. (उस्मानाबाद); राज कुमार (धुळे);
मुलेः पोहणेः १७ ते २१ वयोगटः अस्थिव्यंगः
कार्तिक धुपे (पुणे); खंडू कोळी (उस्मानाबाद); सचिन राठोड (परभणी);
Web Title :- Pune News | Maharashtra State level sports competition for boys and girls with disabilities; Shivshankar Jadhav, Swapnil Dhalkhandait, Shweta Pillewan, Sandhyarani Kadam Yanna first place
हे देखील वाचा :