Pune News | स्वीप नोडल अधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन

March 26, 2024

पुणे : Pune News | भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने यशदा येथे लोकसभा निवडणूकीच्या अनुषंगाने मतदान जनजागृतीबाबत स्वीप नोडल अधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

यावेळी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम, भारत निवडणूक आयोगाचे स्वीप संचालक संतोष अजमेरा, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, आयोगाच्या वरीष्ठ स्वीप सल्लागार अनुराधा शर्मा आदी उपस्थित होते.

कमी मतदान टक्केवारी असलेल्या मतदारसंघातील मतदानात वाढ करणे, शहरी नागरिकांचा निवडणूक प्रक्रियेतील सहभाग वाढावा यासाठी निवडणूक आयोगाच्यावतीने स्वीपअंतर्गत हाती घेण्यात आलेले उपक्रम यांची माहिती देण्यासह वेगवेगळ्या जिल्ह्यात राबविण्यात येत असलेले नाविन्यपूर्ण उपक्रमांबाबत कार्यशाळेत विचारमंथन करण्यात येणार आहे.

Punit Balan Group | ‘राष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धे’त ‘पुनीत बालन ग्रुप’च्या आरती पाटीलला 2 कांस्य पदके