बहुजननामा ऑनलाइन टीम – मित्राच्या बहिणीची छेड काढल्याचा वादातून 21 वर्षीय तरुणावर चौघांनी हल्ला करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. यात तरुण गंभीर जखमी झाला आहे.
शुभम शिवा पवार (वय 21,सेवालाल चौक, जय जवान नगर, येरवडा) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी दर्शन रूपसिंग राठोड (वय 19) व लाल्या उर्फ रवी गोविंद चव्हाण (वय 30) यांच्यासह आणखी दोघांवर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दर्शन राठोड याने काही दिवसांपूर्वी फिर्यादी शुभम पवार याच्या मित्राच्या बहिणीची छेड काढली होती. त्यावर त्यांच्यात भांडण झाले होते. याच भांडणाचा राग मनात धरून त्यांनी तरुणावर हल्ला केला. शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शुभम पवार हा येरवड्यातील सेवालाल चौकात उभा होता. यावेळी आरोपीने त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केले. तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करत त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. दोघांना अटक केली आहे. अधिक तपास येरवडा पोलिस करत आहेत.