बहुजननामा ऑनलाइन टीम – मॉलच्या परिसरात नो पार्किंगमध्ये लावलेल्या वाहनावर कारवाई करणाऱ्या एका महिला पोलीस कर्मचारी व त्याच्या स्टाफला (FIR)सहा जणांच्या टोळक्याने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. भरदुपारी हा प्रकार घडल्याने परिसरात चांगलाच राडा झाला होता.
याप्रकरणी वंदना आल्हाट (वय 42) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार 6 अनोळखी व्यक्तीवर कारवाई करण्यात आली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,
महिला पोलीस नाईक वंदना या विश्रांतवाडी वाहतूक विभागात कार्यरत आहेत. दरम्यान त्या काल दुपारी ऑरबीट मॉल परिसरात बेशिस्त वाहन चालकांविरोधात कारवाई करत होत्या. यावेळी नो पार्किंगमध्ये लावलेल्या कारला त्या जामार लावने वत्यावर कारवाई करत असताना अचानक सहा जण आले. त्यांनी फिर्यादी व त्याच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांशी हुज्जत घातली. तसेच त्याना शिवीगाळ करत मारहाण केली. तर दोन कर्मचाऱ्यांना मारहाण करत त्यांना जखमी देखील केले. या गोंधळा नंतर आरोपी तेथून पसार झाले. वंदना यांनी यानंतर विश्रांतवाडी पोलिसांना घटनेची माहिती दिली. तसेच त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. भरदिवसा हा प्रकार घडल्यानंतर येथे चांगलाच गोंधळ उडाला होता. याप्रकरणी अधिक तपास विश्रांतवाडी पोलीस करत आहेत.