बहुजननामा ऑनलाइन टीम – गाईच्या तुपात भेसळ करून विक्री करणाऱ्यास भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून साडे चार लाख रुपयांचे १ हजार ४९९ किलो भेसळयुक्त तूप जप्त (selling fake cow ghe)करण्यात आले आहे.
शिवराज हळमणी (रा. हात्तीकनबस, अक्कलकोट ) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरात कॉम्बिग ऑपरेशन झाल्यानंतर आता हद्दीत पोलीस पोलीस विशेष लक्ष ठेवत आहेत. दरम्यान भारती विद्यापीठ पोलिसांचे पथक आंबेगाव परिसरात पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी एका टेम्पोतून गाईचे भेसळयुक्त तूप विक्री करण्यासाठी एकजण येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून एका महाविद्यालयासमोर आलेल्या टेम्पोचालकाला ताब्यात घेतले. चौकशीत त्याच्याकडीत टेम्पोतील गाईच्या तुपात भेसळ असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानुसार पोलिसांनी अन्न सुरक्षा अधिकारी क्रांती बारवकर यांच्याशी संपर्वâ साधून माहिती दिली. त्यानुसार भेसळयुक्त तुपाची खात्री झाल्यानंतर १ हजार ४९९ किलो तूप जप्त करण्यात आले आहे.
वरिष्ठ निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक अर्जुन बोत्रे, पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, संतोष भापकर, सोमनाथ सुतार, रवींद्र भोसले, सचिन पवार, अभिजीत जाधव, गणेश शेंडे, राहूल तांबे, विक्रम सावंत यांच्या पथकाने केली.