बहुजननामा ऑनलाइन टीम – पुणे जिल्ह्यासह अहमदनगर जिल्ह्यात धुमाकुळ घालणाऱ्या दोन अट्टल दरोडेखोरांच्या पुणे ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या(Attackers arrested ) आहेत. या दरोडेखोरांनी मागील पाच महिन्यात ओतूर, मंचर, लोणीकंद, पाररनेर आणि आळेफाा परिसरात साथिदारांच्या मदतीने घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नेताजी गंधारे, पोलीस उप निरीक्षक दत्तात्रय गिरमकर, पोलीस हवालदार हनुमंत पासलकर, उमाकांत कुंजीर, विक्रम तापकीर, सचिन गायकवाड, काशीनाथ राजापूरे, पोलीस नाईक दिपक साबळे, जनार्दन शेळके, राजू मोमीन, अजित भुजबळ, मंगेश थीगळे, पोलीस शिपाई संदीप वारे, अक्षय नवले, निलेश सुपेकर, अक्षय जावळे यांच्या पथकाने केली.