देहूरोड/पुणे : बहुजननामा ऑनलाईन: किरकोळ कारणावरुन झालेल्या पती-पत्नीच्या भांडणात पत्नीने पतीला शिवी दिली. याचा राग आल्याने पतीने पत्नीचा गळा दाबून खून केल्याची घटना देहूरोड(Dehuroad) येथे घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि.27) रात्री सातच्या सुमारास गाथा मंदीर रोडवरील साईनगरी वाडाचा मळा, नामदेव निवास येथे घडली. याप्रकरणी देहूरोड(Dehuroad) पोलिसांनी पतीला अटक केली आहे.
पूजा वैभव लामकाने (वय-19) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर वैभव भगवान लामकाने (वय-23) असे अटक करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी मयत पूजाचे वडील सोमनाथ रामदास पाटील (वय-50 रा. बाजार आळी, देहुगाव) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुजा आणि वैभव या पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरुन भांडण झाले. भांडणात पूजाने पती वैभवला आई वरुन शिवी दिली. शिवी दिल्याच्या रागातून वैभवने पत्नी पूजाचा गळा दाबून खून केला. अशी फिर्याद मयत पूजाच्या वडिलांनी दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरुन आरोपी वैभवला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शाहीद पठाण करीत आहेत.