Pune Maitri Box Premier League | मैत्री बॉक्स प्रीमियर लीग-2023 क्रिकेट चषक ‘मनसे’ ने पटकावला; मनसेच्या विजयात चंद्रकांतदादा आनंदी

Pune Maitri Box Premier League | Pune Maitri Box Premier League-2023 Cricket Cup won by ‘MNS’; Chandrakantada is happy with the victory of MNS

पुणे : बहुजननामा ऑनलाइन – Pune Maitri Box Premier League | राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते आणि पत्रकारांच्या तीन दिवसीय मैत्री बॉक्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना राष्ट्रवादी कॉंग्रेस (NCP) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) यांच्यात झाला. अतिशय रंगतदार झालेल्या या सामन्यात मनसेने विजय मिळवत ‘मैत्री बॉक्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धे’च्या चषकावर आपले नाव कोरले. (Pune Maitri Box Premier League)

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीम योद्धा फाउंडेशन (BHIM Yoddha Foundation)
आयोजित क्रिएटिव्ह फाउंडेशन (Creative Foundation ) निमंत्रित
स्वर्गीय डी.बी देवधर स्मरणार्थ मैत्री बॉक्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा.आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत भाजप (BJP), शिवसेना (Shivsena), कॉँग्रेस (Congress), राष्ट्रवादी कॉँग्रेस, शिवसेना ठाकरे गट (Shivsena -UBT), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI), मनसे, मराठी उद्योजक, सामाजिक कार्यकर्ते, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, पत्रकार आणि कलाकार यांच्या टीम सहभागी झाल्या होत्या. ही स्पर्धा अंतिम सामना व बक्षीस वितरणावेळी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) , भीमयोद्धा फाउंडेशनचे अध्यक्ष अॅड. मंदार जोशी (Adv Mandar Joshi), क्रिएटिव्ह फाउंडेशनचे संदिप खर्डेकर (Sandeep Khardekar) यांच्यासह सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून राजकीय नेत्यांमध्ये एका टीकेला दुसऱ्या टीकेने उत्तर दिल्याचे पाहायला मिळत आहे. ही केलेली सर्व वक्तव्य ही मनापासून नसतात.
राजकारणाचा तो एक भाग आहे. आशा परिस्थितीत जेव्हा या मैत्री बॉक्स प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेची
संकल्पना माझ्यापुढे आली तेव्हा मला खूप आनंद झाला. या स्पर्धेच्या माध्यमातून राजकीय कार्यकर्ते, कलाकार,
पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी जी खिलाडू वृत्ती दाखवली ती अशीच टिकवून ठेवावी,
अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.

या स्पर्धेच्या निमित्ताने अॅड. मंदार जोशी यांच्या भीमयोद्धा फाउंडेशनच्या वतीने ऑनलाइन व डिस्टंस लर्निंग
साठी युवा सामाजिक, राजकीय कार्यकर्त्याला स्कॉलरशिप देण्यात आली, तसेच ज्येष्ठ क्रिकेटपटू अन्वर शेख,
महिला क्रिकेट निवड समिती अध्यक्ष रेखा गद्रे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
स्पर्धेचे समालोचन योगेश सुपेकर यांनी केले.

Web Title : Pune Maitri Box Premier League | Pune Maitri Box Premier League-2023 Cricket Cup won by ‘MNS’; Chandrakantada is happy with the victory of MNS